Home Breaking News ⬜🟢🟦प्रतिबिंब🟫🌀🟫

⬜🟢🟦प्रतिबिंब🟫🌀🟫

140

⬜🟢🟦प्रतिबिंब🟫🌀🟫

उठुनिया बघते मी
आरशात प्रतिबिंब
मीच मनात हसते…
पुसटसे दिसे थेंब

घेते जल मुखावरी
पुसुनिया आरशाला
रूप बघावे न्याहळुनी…
मिळे चैतन्य आपणाला

सुप्रभात सौंदर्यता
बघावेच तावदानी
हिरवळ प्रतिबिंब…
झाके कवडसातुनी

बघानिया सागरात
प्रतिबिंब वृक्षाचे थोर
जल निखळ बघता….
अतरंगी मनमोर

माझे मी प्रतिबिंब
काव्य रचित शोधते
शोधतांना एकांतात…..
सदा आभास भासते

🟡सौ. शैला चिमड्यालवार, सहज सुचलं सदस्य सावली

🟪 संकलन -उज्वला निमगडे दुर्गापूर-चंद्रपूर 🟠⬜