Home Breaking News Chandrapur dist @news • उद्या होतोय रंगपंचमीचा सण साजरा! • होणार रंगबेरंगी...

Chandrapur dist @news • उद्या होतोय रंगपंचमीचा सण साजरा! • होणार रंगबेरंगी फूलांची उधळण

38

Chandrapur dist @news
• उद्या होतोय रंगपंचमीचा सण साजरा!
• होणार रंगबेरंगी फूलांची उधळण!

चंद्रपूर:किरण घाटे

चंद्रपूर :पतंजली योग समिती, भारत स्वाभिमान, किसान सेवा समिती व युवा भारतच्या संयुक्तीक विद्यमाने उद्या सोमवार दि. 25 मार्चला होळी सणाच्या निमित्ताने रंगपंचमीचा कार्यक्रम सकाळी 07 ते 09 वाजेपर्यंत आयोजित केला आहे.ह्या कार्यक्रमात फक्त रंगबेरंगी फुलाचा वर्षाव केला जाईल असे आयोजकांनी कळविले आहे.
सदरहु कार्यक्रमात फराळाची व्यवस्था पसायदान जेष्ठ नागरिक संघाच्या वतीने करण्यात आली आहे. तर दुधाची व्यवस्था पतंजली योग समिती,भारत स्वाभिमान,किसान सेवा समिती व युवा भारतच्या वतीने ठेवण्यात आलेली आहे.
उपरोक्त कार्यक्रमाचा मनमुराद आनंद घेण्यासाठी तसेच 90 सहयोग शिक्षकांचा उत्साह वाढविण्याकरिता
चंद्रपूर शहरातील सर्व योगा क्लाॅसचे योग शिक्षक, साधक साधिका व कर्मठ कार्यकर्ते या शिवाय चारही संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व कार्यकर्तेगण त्याच प्रमाणे नवजीवन महिला योग मंडळाचे सर्व पदाधिकारीगण व सदस्य यांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन आयोजकांनी आज केले आहे.पसायदान नागरिक संघाच्या भव्य प्रांगणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.