Home Breaking News Chandrapur dist @news • अखेर प्रतिभा धानोरकर यांना मिळाली काँग्रेसची सिट !...

Chandrapur dist @news • अखेर प्रतिभा धानोरकर यांना मिळाली काँग्रेसची सिट ! •जनतेत पसरला उत्साह! •होणार चंद्रपूर वणी आर्णी या मतदारसंघात लोकसभेच्या जागेसाठी अतितटीची लढत! •आ.प्रतिभा धानोरकर पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार!

330

Chandrapur dist @news
• अखेर प्रतिभा धानोरकर यांना मिळाली काँग्रेसची सिट !
•जनतेत पसरला उत्साह!
•होणार चंद्रपूर वणी आर्णी या मतदारसंघात लोकसभेच्या जागेसाठी अतितटीची लढत!
•आ.प्रतिभा धानोरकर पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरणार!

चंद्रपूर किरण घाटे

चंद्रपूर:गत लोकसभा निवडणुकीत स्व.बाळू धानोरकर यांनी अवघ्या १३ दिवसांच्या प्रचारात बाजी मारत ह्या जागेवर घवघवीत यश संपादन केले होते. महाराष्ट्रातील कांग्रेससाठी ती एकमेव सिट होती .तिचं प्रचाराची रणनिती ताईंची असणार असल्याचे बोलल्या जाते . ग्रामीण भागातून ताईला सहानुभूतीची साथ आहे.याच बळावर ताईने विजयाच्या दिशेने वाटचाल केल्यास याचे कोणाला ही नवल वाटायला नको.

सध्या भद्रावती वरोरा विधानसभा मतदारसंघाच्या प्रतिभा धानोरकर ह्या विद्यमान आमदार आहेत. अनेकदा त्यांनी विविध मागण्यांवर विधानसभेत आपला बुलंद आवाज उठविला होता.त्या भद्रावतीत वास्तव्य करीत जरी असल्या तरी वणी आर्णी भागात लोकांना त्यांची ओळख व नांव चांगलेच परिचित आहे.