Home Breaking News Varora taluka@ news •साई वर्धा पावर लावणार तीन एकरावर चंदन वृक्ष •पावसाळ्यात...

Varora taluka@ news •साई वर्धा पावर लावणार तीन एकरावर चंदन वृक्ष •पावसाळ्यात 500 चंदन वृक्ष लावण्याचा संकल्प • इतर उद्योग व्यवस्थापनाने घ्यावी प्रेरणा हरित मित्र :किशोर उत्तरवार

92

Varora taluka@ news
•साई वर्धा पावर लावणार तीन एकरावर चंदन वृक्ष
•पावसाळ्यात 500 चंदन वृक्ष लावण्याचा संकल्प
• इतर उद्योग व्यवस्थापनाने घ्यावी प्रेरणा हरित मित्र :किशोर उत्तरवार

✍️खेमचद नेरकर
सुवर्ण भारत: तालुका प्रतिनिधी

वरोरा: चंदनाला अन्यन्य साधारण महत्व असून त्यापासून विविध प्रकारच्या सुगंधित वस्तू निर्माण होतात.चार वर्षापूर्वी साई वर्धा पॉवर कंपनीमध्ये 100 झाडे लावण्यात आली होती.त्या झाडांचे संगोपन हरितमित्र परिवारातर्फे करण्यात आले. योग्य देखरेखी व काळजी घेतल्यामुळे आज तीच झाडे 25 फूट उंच वाढलेली आहे.येत्या पावसाळ्यात 500 चंदन लावण्याचा संकल्प साई वर्धा पॉवर ने केला आहे.हिच प्रेरणा इतर उद्योगांनी घ्यावीअसे हरित मित्र किशोर उत्तरवार यांनी आवाहन केले आहे.

चंदनाचे लाकूड मुलायम असल्यामुळे विविध देवी – देवतांच्या मुर्त्या बनविण्यासाठी विदेशात मोठी मागणी आहे.पर्यावरणाचे दृष्टीने बघितले तर सर्वात जास्त ऑक्सिजन देणारे हे वृक्ष आहे.हरित मित्र किशोर उत्तरवार यांचे माहितीनुसार साधारणतः 20 ते 25 वर्षामध्ये हे वृक्ष पूर्णत्वास येतात.एका वृक्षापासून साधारण 30 ते 35 किलो चंदन मिळत असूनnआजचा बाजारभाव 10,000 किलो प्रमाणे आहे.साई वर्धा पॉवर कंपनीने 500 झाडे लावण्याचा संकल्प बोलून दाखविला आणि संकल्प सत्यात उतरवू असेही कंपनी व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले अशी हरित मित्र किशोर उत्तरवार यांची माहिती असून याप्रसंगी हरित मित्र दामोधर भाजपाले,राजू काळे,प्रविण सुराणा,स्वप्नील देवाळकर,सुनील गायकवाड यांची उपस्थिती होती.