Home Breaking News Chandrapur dist @news • आ.प्रतिभा धानोरकर यांचे चंद्रपूरात जंगी स्वागत! •अनेक...

Chandrapur dist @news • आ.प्रतिभा धानोरकर यांचे चंद्रपूरात जंगी स्वागत! •अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेगण आगमना प्रसंगी उपस्थित!

467

Chandrapur dist @news

• आ.प्रतिभा धानोरकर यांचे चंद्रपूरात जंगी स्वागत!
•अनेक पदाधिकारी व कार्यकर्तेगण
आगमना प्रसंगी उपस्थित!

चंद्रपूर :किरण घाटे

वरोरा -भद्रावती विधानसभा क्षेत्रातील काॅंग्रेसच्या विद्यमान आमदार तथा दिवंगत खा.बाळू धानोरकर यांच्या अर्धांगिनी प्रतिभा धानोरकर यांचे आज दुपारी चंद्रपूरच्या गांधी चौकात आगमन झाले .त्या वेळी काँग्रेस पक्षाच्या अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले.काल रात्री उशिरा त्यांचे नांव चंद्रपूर वणी आर्णी लोकसभा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्यास पक्षश्रेष्ठींकडून शिक्कामोर्तब झाले. या क्षेत्राची लोकसभा निवडणूक लढण्याची आपणांस संधी मिळावी या साठी त्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने प्रयत्नशिल होत्या दरम्यान चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक नेते व कार्यकर्त्यांची (त्यांना कांग्रेस पक्षातर्फे )तिकीट मिळावे ही मागणी सुध्दा होती .
आ.प्रतिभा धानोरकर यांना लोकसभेची उमेदवारी देण्यात यावी या साठी काही महिला कार्यकर्त्या दिल्लीत देखील पोहचल्या होत्या.शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आले.लोकसभा निवडणुकीसाठी काल उशिरा त्यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर धानोरकर ह्या दिल्ली वरुन आज नागपूर एअर पोर्टवर पोहचल्या नंतर त्यांचे दुपारी चंद्रपूर शहरात आगमन झाले .तेव्हा “ताई आगे बढो❗हम तुम्हारे साथ है “❗असे कार्यकर्त्यांतून नारे गुंजले ! रंगपंचमीचा सण असून देखील चंद्रपूर जिल्ह्यातील शेकडों पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित झाले होते.