Home Breaking News Chandrapur dist @news • चंद्रपूर- वणी -आर्णी -लोकसभा निवडणूक आ.प्रतिभा धानोरकरांचे उद्या...

Chandrapur dist @news • चंद्रपूर- वणी -आर्णी -लोकसभा निवडणूक आ.प्रतिभा धानोरकरांचे उद्या होणार नामांकनपत्र दाखल! •अनेक दिग्गज नेत्यांची राहणार उपस्थिती ; एका भव्य रॅलीसह निर्धार सभेचेही आयोजन !

182

Chandrapur dist @news
• चंद्रपूर- वणी -आर्णी -लोकसभा निवडणूक आ.प्रतिभा धानोरकरांचे उद्या होणार नामांकनपत्र दाखल!
•अनेक दिग्गज नेत्यांची राहणार उपस्थिती ; एका भव्य रॅलीसह निर्धार सभेचेही आयोजन !

चंद्रपूर :किरण घाटे

चंद्रपूर -वणी -आर्णी -या लोकसभा मतदारसंघासाठी वरोरा भद्रावती क्षेत्रातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विद्यमान आमदार तथा दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या अर्धांगिनी प्रतिभा धानोरकर ह्या उद्या अनेक दिग्गज नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत इंडिया आघाडीच्या वतीने आपला उमेदवारी दाखल करणार असल्याचे वृत्त आहे.दरम्यान त्यांना चंद्रपूर- वणी -आर्णी या लोकसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्याची संधी देण्यात यावी अशी मागणी चंद्रपूर जिल्ह्यातील महिलांसह चंद्रपूर -वणी -आर्णी क्षेत्रातील काॅंग्रेसच्या वरिष्ठ व युवा नेत्यांनी पक्षश्रेष्ठीकडे केली होती.त्यांना ही उमेदवारी मिळाल्यामुळे पदाधिकारी व कार्यकर्त्यांत चांगलाच उत्साह निर्माण झाल्याचे चित्र एकंदरीत दिसून येत आहे. उद्या बुधवारी त्या चंद्रपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आपला उमेदवारी अर्ज एका विराट रॅलीच्या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करून दाखल करीत आहे. स्थानिक दादमहाल वार्डातील कोहीनूर मैदान येथून सकाळी ११वाजता एका भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.ह्या रॅलीत पदाधिकारी व कार्यकर्ते स्वयंस्फुर्तिंने सहभागी होत आहेत.विशेषता महिला व तरुणींची उपस्थिती लक्षणीय राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. चंद्रपूर -नागपूर या मुख्य मार्गावरील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर एका निर्धार सभेचे दुपारी तीन वाजता आयोजन करण्यात आले असून या सभेला विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार सुभाष धोटे, आ.सुधाकर अडबाले,माजी आमदार वामनराव कासावार,माजी आमदार बाळासाहेब मुनगिरवार,माजी आमदार ख्वाजा बेग,या शिवाय माजी आमदार विश्वास नांदेकर,शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य,उबाठा गटाचे संदीप गि-हे , मराठा सेवा संघाचे दिलीप चौधरी, समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष सोहेल शेख , सीपीएमचे नेते अरुण भेलके, सीपीआयचे नेते प्रकाश रेड्डी, आयटकचे नेते अधिवक्ता रविन्द्र उमाठे,आपचे जिल्हाध्यक्ष मयूर राईंचवार संजय देरकर यांच्या सह इंडिया आघाडीतील अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती राहणार आहे.