Home Breaking News Chandrapur dist @news • चंद्रपूरात निघाली इंडिया आघाडीची लक्षवेधक विराट रॅली!...

Chandrapur dist @news • चंद्रपूरात निघाली इंडिया आघाडीची लक्षवेधक विराट रॅली! • निर्धार सभेत केले दिग्गज नेत्यांनी” ताईंना” निवडूण आणण्याचे आवाहन! • रॅलीत आ.प्रतिभा धानोरकरांसह चंद्रपूर -वणी -आर्णीतील हजारों नागरिकांची उपस्थिती !

356

Chandrapur dist @news

• चंद्रपूरात निघाली इंडिया आघाडीची लक्षवेधक विराट रॅली! • निर्धार सभेत केले दिग्गज नेत्यांनी” ताईंना” निवडूण आणण्याचे आवाहन!
• रॅलीत आ.प्रतिभा धानोरकरांसह चंद्रपूर -वणी -आर्णीतील हजारों नागरिकांची उपस्थिती !

किरण घाटे:विशेष प्रतिनिधी

चंद्रपूर शहरात आज बुधवारला इंडिया आघाडीच्या वतीने दुपारी एका विराट रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

चंद्रपूर -वणी -आर्णी -या लोकसभा मतदारसंघासाठी वरोरा भद्रावती क्षेत्रातील भारतीय राष्ट्रीय इंदिरा काँग्रेसच्या विद्यमान आमदार तथा दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या अर्धांगिनी प्रतिभा धानोरकर यांच्यासह या लोकसभा मतदारसंघातील आजी ,माजी आमदार, इंडिया आघाडीचे दिग्गज नेते, पदाधिकारी, युवा नेतेगण व कार्यकर्ते हजारों संख्येंने सहभागी झाले होते.रखरखत्याही उन्हातही या रॅलीत तरुणी व महिलांची उपस्थिती लक्षणीय अशीच होती.सदरहु रॅली दादमहाल स्थित कोहीनूर मैदानातून निघाली .शहरातील मुख्य मार्गाने ही रॅली मार्गक्रमण करीत असताना अनेक ठिकाणी नागरिकांनी आ. धानोरकर यांना पुष्पगुच्छ देत त्यांना शुभेच्छा दिल्या.आजच्या या रॅलीने इंडिया आघाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढला असल्याचे एकंदरीत दिसून आले.रॅलीला बघण्यासाठी शहरातील गिरणार चौक, गांधी चौक, जयंत टाॅकीज चौक व जटपूरा गेट येथे रस्त्याच्या दुतर्फा बघ्यांची अलोट गर्दी लोटली होती.त्यांचेवरील मतदारांचा आशिर्वाद,अमाप प्रेम व सहानुभूतीचा प्रत्यय आज या रॅलीच्या निमित्ताने प्रत्यक्षात दिसून आला . चंद्रपूर- नागपूर रोडवरील न्यू इंग्लिश हायस्कूलच्या मैदानावर पार पडलेल्या एका भव्य निर्धार सभेत अनेक नेत्यांची भाषणे झाली.त्यात त्यांनी सत्ताधारी पक्षावर जोरदार टीकास्त्र सोडले.तदवंतच त्यांनी आ.प्रतिभा धानोरकर यांना सर्वाधिक मताने निवडूण देण्याचे आवाहन या वेळी केले.