Home Breaking News • चंद्रपूर -वणी -आर्णी- लोकसभा निवडणूकीकडे वेधले विदर्भातील राजकीय नेत्यांचे लक्ष !...

• चंद्रपूर -वणी -आर्णी- लोकसभा निवडणूकीकडे वेधले विदर्भातील राजकीय नेत्यांचे लक्ष ! • होणार तिहेरी लढत !

522

• चंद्रपूर -वणी -आर्णी- लोकसभा निवडणूकीकडे वेधले विदर्भातील राजकीय नेत्यांचे लक्ष !

• होणार तिहेरी लढत !

चंद्रपूर: किरण घाटे

चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभा निवडणूकीकडे चंद्रपूर -यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भातील अनेक राजकीय नेत्यांचे लक्ष वेधले आहे.सध्या सोशल मीडियावर काही राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते आपल्या उमेदवारांबाबत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडताना दिसत आहे.येत्या एक तारखेपासून ख-या अर्थाने निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल.चंद्रपूर वणी आर्णी या लोकसभा मतदारसंघात तिहेरी लढत होईल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.प्रचारात कोण आघाडी घेईल हे आज जरी सांगता येत नसले तरी सध्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या मतदार संघातील गावोगांवी मतदारांच्या भेटीगाठी वाढल्या असल्याचे दृष्टीक्षेपात पडत आहे.येत्या एक दोन दिवसात प्रचाराला वेग येईल.चंद्रपूर -वणी -आर्णी या लोकसभा क्षेत्रातील उमेदवार सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर राजेश बेले या शिवाय अन्य उमेदवार लवकरच प्रचारात उतरतील.प्रत्येक उमेदवारांना आपल्या विजयाची आशा लागली आहे.