Home Breaking News चंद्रपूर -वणी -आर्णी- लोकसभा निवडणूक ; दुहेरी लढत होण्याचे संकेत! • वेधले...

चंद्रपूर -वणी -आर्णी- लोकसभा निवडणूक ; दुहेरी लढत होण्याचे संकेत! • वेधले अनेक राजकीय नेत्यांचे लक्ष !

122

• चंद्रपूर -वणी -आर्णी- लोकसभा निवडणूक ; दुहेरी लढत होण्याचे संकेत!
• वेधले अनेक राजकीय नेत्यांचे लक्ष !

चंद्रपूर:किरण घाटे

चंद्रपूर -वणी -आर्णी लोकसभा निवडणूकीकडे चंद्रपूर -यवतमाळ जिल्ह्यासह विदर्भातील अनेक राजकीय नेत्यांचे लक्ष वेधले आहे.सध्या सोशल मीडियावर काही राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्ते आपल्या उमेदवारांबाबत केलेल्या कामांचा लेखाजोखा मांडताना दिसत आहे.येत्या एक दोन दिवसांत ख-या अर्थाने निवडणूक प्रचाराला सुरुवात होईल.चंद्रपूर वणी आर्णी या लोकसभा मतदारसंघात दुहेरी लढत होईल असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे.प्रचारात कोण आघाडी घेईल हे आज जरी सांगता येत नसले तरी सध्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या मतदार संघातील गावोगांवी मतदारांच्या भेटीगाठी वाढल्या असल्याचे दृष्टीक्षेपात पडत आहे.येत्या तीन तारखेपासून प्रचाराला वेग येईल.चंद्रपूर -वणी -आर्णी या लोकसभा क्षेत्रात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार, कांग्रेसच्या प्रतिभा धानोरकर व वंचितचे राजेश बेले निवडणूक रिंगणात उतरले असून या शिवाय काही अन्य उमेदवार या निवडणुकीत आपले नशिब अजमावून बघत आहे ते लवकरच प्रचारात उतरतील.प्रत्येक उमेदवारांना आपल्या विजयाची आशा लागली जरी असली तरी भाजप व काँग्रेसच्या उमेदवारात अतितटीची लढत होईल असे काही राजकीय मंडळींचे म्हणणे आहे.प्रतिभा धानोरकर यांच्या प्रचाराची धुरा काही जेष्ठ मंडळीसह युवा नेत्यांनी सांभाळली असल्याचे दिसून येत आहे.ताईंना निवडूण आणण्यासाठी चंद्रपूर वणी आर्णी मतदार संघातील महिलांनी देखील कंबर कसली आहे.ग्रामीण भागात ताईंचा प्रचार जोमाने वाढत आहे.