Home Breaking News Chandrapur dist@ news •वनविभाग शिवणीच्या रोखलेखा खर्च प्रमाणकेची सखोल चौकशी करा...

Chandrapur dist@ news •वनविभाग शिवणीच्या रोखलेखा खर्च प्रमाणकेची सखोल चौकशी करा -दत्तात्रय समर्थ यांची मागणी!

217

Chandrapur dist@ news

•वनविभाग शिवणीच्या रोखलेखा खर्च प्रमाणकेची सखोल चौकशी करा -दत्तात्रय समर्थ यांची मागणी!

सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)

चंद्रपूर जिल्ह्यातील वनपरिक्षेत्र वन विभाग प्रादेशिक शिवनी कार्यालयाच्या रोखलेल्या खर्च प्रमाणकेची एसटीआय द्वारा चौकशी करावी अशी मागणी चंद्रपूर जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेलचे शहराध्यक्ष तथा सामान्य कामगार सेवा चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या कडे एका लेखी निवेदनातून गुरुवार दि. २५एफ्रिलला परत एकदा केली आहे.समर्थ यांनी या पूर्वी या तक्रारीची एक प्रत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कडे सादर केली आहे.तदवतंच
उपरोक्त प्रकरणात सखोल चौकशी करण्याची मागणी या अगोदर शिवणीचे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मुरलीधर गायकवाड यांनी या प्रकरणाच्या अनुषंगाने केली होती हे येथे उल्लेखनीय आहे.दरम्यान त्यांनी या संदर्भात काही दिवसांपूर्वी सिंदेवाही मुक्कामी एक पत्रकार परिषद घेवून पत्रकारांना या बाबतीत सविस्तर माहिती दिली होती.उपरोक्त प्रकरणाबाबत दत्तात्रय समर्थ हे सातत्याने पाठपुरावा करत आहे.