Home Breaking News Mul taluka@ news • वाढत्या प्रदुषणाबाबत चौकशी करा-चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे...

Mul taluka@ news • वाढत्या प्रदुषणाबाबत चौकशी करा-चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे मूलच्या तहसिलदार मृदूला मोरे यांना पत्र! • सामान्य कामगार सेवाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थंनी केली होती वरिष्ठांकडे तक्रार दाखल!

317

Mul taluka @ news
•  वाढत्या प्रदुषणाबाबत चौकशी करा-चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे मूलच्या तहसिलदार मृदूला मोरे यांना पत्र!
• सामान्य कामगार सेवाचे चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थंनी केली होती वरिष्ठांकडे तक्रार दाखल!

सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)

मूल :चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील मरेगांव येथील जी.आर.क्रिष्णा फेरो ॲलाय कंपनी बाबत सामान्य कामगार सेवाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळासह चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे कडे लेखी तक्रार सादर केली होती. प्रदुषणामुळे स्थानिक नागरिकांना विविध प्रकारचे आजार जडत असल्याचे सादर केलेल्या तक्रारीत नमूद केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून उपरोक्त कंपनी या ठिकाणी विटा तयार करण्याचे काम करीत असून विटासाठी वापरण्यात येणाऱ्या राखेमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषणात वाढ झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.दरम्यान चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी उपरोक्त प्रदुषणाच्या बाबतीत त्वरित दखल घेवून मूलच्या तहसिलदार मृदूला मोरे यांना सखोल चौकशी करण्याचे नुकतेच पत्र दिले असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.समर्थ यांनी या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नागपूर महसूल विभागाचे आयुक्त यांना देखील लेखी तक्रार दिली असल्याचे या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले.