Home Breaking News Ballarpur taluka@ news • ना . सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न...

Ballarpur taluka@ news • ना . सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न कायम ? • चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील बामणी प्रोटीन उद्योग पूर्णतः बंद करण्याचा कंपनी व्यवस्थापनाचा निर्णय ?

563

Ballarpur taluka@ news
• ना . सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यात बेरोजगारीचा प्रश्न कायम ?

• चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर तालुक्यातील बामणी  प्रोटीन उद्योग पूर्णतः बंद करण्याचा कंपनी व्यवस्थापनाचा निर्णय ?

सुवर्ण भारत: शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर : चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या जिल्ह्यात प्रदूषणाचा नावाखाली दोन प्रसिद्ध उद्योग बंद पडल्यामुळे हजारों कामगारांवर उपासमारीची पाळी आलेली आहे. विदर्भाच्या बल्लारपूर तालुक्यातील बामणी गावातील बामणी प्रोटीन्स लिमिटेड आणि भद्रावती तालुक्यातील बेलगांव येथील सनफ्लॅग स्टील अँड मेटल या कंपनीवर   तक्रारींच्या अनुषंगाने सदरहु उद्योग बंद करण्याची पाळी आली आहे.

एकीकडे जगभरात रोजगाराची समस्या भयानक रूप धारण करीत असताना दुसरीकडे चालू उद्योग बंद होणे हे दुर्भाग्यपूर्ण आहे असे मत या संदर्भात बोलताना अनेक बेरोजगारांनी व्यक्त केले ‌आहे.जिल्ह्यातील उद्योग एक एक करून बंद होत असताना प्रशासन आणि राजकीय नेते याबाबतीत उदासीन दिसून येत आहे.   जिल्ह्यातील उद्योग बंद झाल्यामुळे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असे हजारों लोकांचे रोजगार संपण्याचे प्रमाण वाढत आहे, त्यामुळे अनेक कामगार आणि त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी आलेली आहे, कामगारांच्या मुलांबाळांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर येऊन टांगलेला आहे, जर जिल्ह्यातील उद्योगातील बंद होत राहिले तर विकासाच्या नावाखाली जो आज गाजावाजा होत आहे त्याचा काय उपयोग ?असा प्रश्न देखील अनेकांनी उपस्थित केला आहे.तदवतंच
जिल्ह्यात जर सामान्य माणसांवर या प्रकारचा अन्याय होत असेल तर कामगारांनी कुणाकडे आशेने बघायचे हा प्रश्न साहजिकच कामगारांच्या वतीने विचारल्या जात आहे.याबाबत शासनाने आणि चंद्रपूर जिल्ह्यातील राजकीय नेत्यांनी मध्यस्थी करून यावर तोडगा काढावा अशी कामगारांनी अपेक्षा व्यक्त केली आहे.