Ballarpur city@ news
• बल्लारपूर शहर शिवसेना उबाठा गटा तर्फे कारवा मार्गाचे पुला खाली जमलेले गाडे साफ करण्यास मागणी.
सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)
बल्लारपुर :- पावसाळ्या मुळे बल्लारपुर व कारवा, जुनोना गावाचा संपर्क तुटे नवे या अनुषंगाने शिवसेना जिल्हा प्रमुख संदीप गिऱ्हे यांच्या मार्गदर्शनाखाली व उप जिल्हाप्रमुख सिक्की यादव यांच्या नेतृत्वाखाली शहर बल्लारपुर शिवसेना तर्फे तालुका प्रमुख प्रकाश पाठक, शहर प्रमुख बाबा शाहू, उप शहर प्रमुख कैलाश मोटघरे तसेच युवासेना चे गौरव नाडमवार , सचिन अंबादे व इतर शिवसैनिकांच्या प्रमुख उपस्थिती सहायक अभियंता प्रथम श्रेणी सार्वजनिक बांधकाम विभाग बल्लारपुर यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात पावसामुळे बल्लारपुर कारवा जुनोना गावाला जोडणारे पुलाखाली जमलेला गाडा मुळे पाणी पुलावरून वाहते त्यामुळे दोन्ही गावाचा संपर्क तुटते. या कारणामुळे गावातील नागरिकांना आरोग्य विषयी तसेच आठवळी बाजारात व अतिआवश्यक कामास पडल्यावर यामार्गा ये जा करने अवघड असते. म्हणून भविष्यात होणार्या अडचणी टाळण्यासाठी पुलाची साफ सफाई करणे गरचे आहे. प्रशासन मार्ग मोकळा करण्यास निवेदन देण्यात आले.
