Home Breaking News • मरेगांव – प्रदुषणाबाबत त्वरित चौकशी करण्याचे दिले प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव...

• मरेगांव – प्रदुषणाबाबत त्वरित चौकशी करण्याचे दिले प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी आश्वासन! • दत्तात्रय समर्थ यांनी घेतली यादव यांची भेट!

131

• मरेगांव – प्रदुषणाबाबत त्वरित चौकशी करण्याचे दिले प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांनी आश्वासन!
• दत्तात्रय समर्थ यांनी घेतली यादव यांची भेट!

सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)

चंद्रपूर -चंद्रपूर जिल्ह्याच्या मूल तालुक्यातील मरेगांव येथील जी.आर.क्रिष्णा फेरो ॲलाय कंपनी बाबत सामान्य कामगार सेवाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्तात्रय समर्थ यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळासह चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा यांचे कडे लेखी तक्रार सादर केली होती. प्रदुषणामुळे स्थानिक नागरिकांना विविध प्रकारचे आजार जडत असल्याचे सादर केलेल्या तक्रारीत नमूद केले होते. गेल्या अनेक वर्षांपासून उपरोक्त कंपनी या ठिकाणी विटा तयार करण्याचे काम करीत असून विटासाठी वापरण्यात येणाऱ्या राखेमुळे मोठ्या प्रमाणात प्रदुषणात वाढ झाली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.दरम्यान काल शुक्रवारी दुपारी १वाजता समर्थ यांनी चंद्रपूर येथील महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी तानाजी यादव यांची शिष्टमंडळासह भेट घेत त्यांनी उपरोक्त कंपनी बाबत तक्रार दिली व प्रदुषण कसे होते या बाबतीत त्यांना समजावून सांगितले.या शिष्टमंडळात सामाजिक कार्यकर्ते पुंडलिक गोठे, मधुकर कोडापे व अन्य सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.परिस्थितीचे गांभिर्य जाणत त्यांनी सदरहु कंपनी बाबत सखोल चौकशी करत योग्य ती कारवाई करू असे आश्वासन प्रादेशिक अधिकारी यादव यांनी शिष्टमंडळाला दिले.आपल्याकडे तीन जिल्ह्यांचा कार्यभार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.समर्थ यांनी सदरहु कंपनी संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व नागपूर महसूल विभागाचे आयुक्त यांना देखील लेखी तक्रार दिली असल्याचे या प्रतिनिधीशी काल चंद्रपूर मुक्कामी बोलताना सांगितले.विशेष म्हणजे दत्तात्रय समर्थ यांनी या पूर्वी दोनदा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाला निवेदन सादर केले आहेत.