Home Breaking News Nagbhid taluka@ news •अवैध वाळू वाहतूक प्रकरणी तळोधी पोलिसांनी केली कारवाही/१२लाख २६...

Nagbhid taluka@ news •अवैध वाळू वाहतूक प्रकरणी तळोधी पोलिसांनी केली कारवाही/१२लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

92

Nagbhid taluka@ news
•अवैध वाळू वाहतूक प्रकरणी तळोधी पोलिसांनी केली कारवाही/१२लाख २६ हजार रुपयांचा मुद्देमालासह ट्रॅक्टर जप्त

सुवर्ण भारत:अरुण रामुजी भोले
नागभिड तालूका प्रतिनिधी

नागभिड —नागभिड तालुका अप्पर तहसिल श्रेञ मधिल पोलीस स्टेशन तळोधी (बा) दिनांक–19.05.2024 रोजी रात्री पेट्रोलिंग करित असतांना बाळापुर येथे तळोधी पोलिसांना अवैध रेती वाहतुकीची गोपनिय माहीती मिळाली त्यानुसार कारवाई केली असता सोनालीका कंपनिचे विना क्रमांकाचे, निळ्या रंगाचे सिकंदर ट्रॅक्टर व त्यास विना क्रमांकाची ट्रॉली व एक EICHER कंपनिचा सिल्व्हर रंगाचा विना क्रमांकाचा ट्रॅक्टर व ट्रॉली असे रेती या गौण खनिजाची चोरटी वाहतुक करतांना मिळुन आल्याने 02 ट्रॅक्टर , ट्रॉली . रेती व आरोपीचा मोबाईल हॅन्डसेट असा एकुण 12,26,000/- रु.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन ट्रॅक्टर चालक नामे 1) सुरज सुधाकर कुंभारे वय. 22 वर्षे धंदा- ट्रॅक्टर चालक रा. वांद्रा ता.ब्रम्हपुरी 2) ट्रॅक्टर मालक नामे तोतेश्वर उर्फ बाळु अभिमन चंहादे रा.वांद्रा 3) EICHER कंपनिचा ट्रॅक्टर वरिल चालक नामे भाग्यवान हरिदास सातपुते वय. 25 वर्षे धंदा- ट्रॅक्टर चालक रा. वांद्रा ता.ब्रम्हपुरी 4) ट्रॅक्टर मालक नामे गुरदेव निळकंठ वाघळे रा.वांद्रा ता.ब्रम्हपुरी यांचे विरुद्ध तळोधी पोस्टे येथे दि.20/05/24 रोजी अप क्र. 81/24 कलम 379, 34 भादवि सहकलम 3 (1)/181, 50/177 मोवाका अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.
सदर कारवाई ‌ठाणेदार सपोनि अजितसिंग देवरे,सफौ हरिराम नैताम,पोहवासिडाम ,पोहवा श्यामलाल कोंडापे यांनी केली असुन पुढील तपास सुरू असुन ईतर आरोपींचा शोध सुरू आहे.