Home Breaking News • सुपरिचित चित्रकार किशोर नवलेंच्या कलेतून साकारले माजी खा.नरेशबाबू पुगलिया!

• सुपरिचित चित्रकार किशोर नवलेंच्या कलेतून साकारले माजी खा.नरेशबाबू पुगलिया!

171

• सुपरिचित चित्रकार किशोर नवलेंच्या कलेतून साकारले माजी खा.नरेशबाबू पुगलिया!

चंद्रपूर : येथील चित्रकार किशोर नवले यांनी आपल्या कलेतून अप्रतिमरित्या हुबेहुब काॅंग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते ,कामगारांचे मसिहा तथा माजी खासदार नरेशबाबू पुगलिया यांचे छायाचित्र रेखाटले आहे! चंद्रपूर तहसिल कार्यालय अंतर्गत येणाऱ्या घूग्घूस येथे ते मंडळ अधिकारी म्हणून गेल्या काही वर्षांपासून कार्यरत आहेत.या पूर्वी त्यांनी विदर्भ पटवारी संघटनेचे झुंजार नेते तथा पटवा-यांचे आधारस्तंभ संघर्षि दिवंगत वि.म.उजवणे यांचे छायाचित्र उतत्म व सुरेखरित्या आपल्या कुंचल्यातून साकारले होते.बालपणापासून त्यांना चित्रकलेची अमाप आवड असून आज पावेतो त्यांनी अनेक समाजसेवक, विदर्भातील जेष्ठ अधिकारी तथा कलाकारांचे चित्र हुबेहुब रेखाटले आहे.त्यांच्या कलेची स्तुती जेव्हढी करावी तेव्हढी कमीच आहे.साहित्य , सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक नामवंत मंडळींनी नवले यांच्या सर्वोत्तम व उत्कृष्ट कलेला नेहमीच दाद दिली आहे.