Home Breaking News Ghugus city@ news • घुग्घुस फुटपाथ दुकानदार संघटनेची न. प. मुख्याधिकारी...

Ghugus city@ news • घुग्घुस फुटपाथ दुकानदार संघटनेची न. प. मुख्याधिकारी सोबत बैठक

158

Ghugus city@ news

• घुग्घुस फुटपाथ दुकानदार संघटनेची न. प. मुख्याधिकारी सोबत बैठक

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस येथील फुटपाथ दुकानदार संघटनेची भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्यासह न. प. चे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार यांच्यासोबत मंगळवारी अतिक्रमण हटविण्याच्या मोहिमेत आपल्या बाजू मांडण्याच्या संदर्भात बैठक पार पडली.

नवीन बसस्थानक चौकातील फुटपाथ दुकानदारांना अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे. मागील २० ते २५ वर्षांपासून याठिकाणी दुकान थाटून आपल्या परिवाराचा उदरनिर्वाह दुकानदार करीत आहे. अतिक्रमण हटविण्याबाबत नोटीस दिल्याने दुकान बंद होणार त्यामुळे दुकानदारांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ येणार. त्यामुळे दुकानदारांना कॉम्पलेक्स स्वरूपात दुकानाची जागा उपलब्ध करून द्यावी. अशा मागणीचे निवेदन देण्यात आले.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे, संघटनेचे अध्यक्ष गजानन बोम्मावार, सचिव सुनील वावरे, कोषाध्यक्ष उत्तम उपरे, काशी यादव, सतीश मांदाडे, शंकर कटकुरवार, इस्लाम सिद्दीकी, विक्की यादव, सुनील कोहाड, अशोक दुबे, शुभम यादव, विठ्ठल दूरडकर, विलास निखाडे, संतोष लोखंडे आदींची उपस्थिती होती.