Home Breaking News Chandrapur city@ news •चंद्रपूरात विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धरणे आंदोलन!

Chandrapur city@ news •चंद्रपूरात विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धरणे आंदोलन!

102

Chandrapur city@ news
•चंद्रपूरात विविध मागण्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे धरणे आंदोलन!

चंद्रपूर :किरण घाटे

शहरातील मनपा मध्ये सुरू असलेल्या अनागोंदी कारभाराची तातडीने चौकशी करा ,अमृत योजनेचा पाणीपुरवठा नियमित सुरू करावा या प्रमुख दोन मागण्यांसह अन्य काही आवश्यक व महत्त्वांच्या मागण्यांसाठी राष्ट्रवादी (शरद पवार गट) कांग्रेस पार्टीच्या वतीने आज शुक्रवार दि.२४मे ला स्थानिक गांधी चौकात सकाळी ११वाजता धरणे आंदोलन करण्यात आले.

या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर जिल्हाध्यक्ष दिपक जयस्वाल, उपाध्यक्ष राहुल देवतळे व पार्टीचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येंने उपस्थित होते.राहुल देवतळे यांनी या आधी सुध्दा पिण्याच्या पाण्यासाठी अनेकदा चंद्रपूर शहरात आंदोलन केली होती.आजही शहरात काही भागात पाणी समस्या कायम असून या गंभीर बाबीकडे मनपाच्या आयुक्तांनी म्हणावे तसे लक्ष पुरविले नाही. मनपा विषयी जनतेत आजही नाराजीचे सुर उमटत आहे.अतिक्रमण हटाव मोहिमत देखील स्थानिक मनपाने पक्षपातीचे धोरण अवलंबिले असल्याचा आरोप सातत्याने जनतेतून होत असल्याचे दिसून येते.