Home Breaking News Ghugus City @news • अदानी फाउंडेशन,चांदा सिमेंट वर्क्स मार्फत नकोडा गावात मोफत...

Ghugus City @news • अदानी फाउंडेशन,चांदा सिमेंट वर्क्स मार्फत नकोडा गावात मोफत आरोग्य सेवा शिबीर सुरु

24

Ghugus City @news
• अदानी फाउंडेशन,चांदा सिमेंट वर्क्स मार्फत नकोडा गावात मोफत आरोग्य सेवा शिबीर सुरु

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

अदानी फाउंडेशन, चांदा सिमेंट वर्क्स यांनी नकोडा ग्रामपंचायत यांच्या सहकार्याने २६ मे २०२४ रविवार रोजी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नकोडा येथे साप्ताहिक आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले.
एकूण १०२ रुग्णांची तपासणी, वैद्यकीय सल्ला आणि मोफत औषधी वितरण करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटक कृष्ण मोहन, मुख्य व्यवस्थापक, एसीसी चांदा सिमेंट वर्क्स,प्रफुल पाटील, एसीसी मानव संसाधन व्यवस्थापक, किरण बांदुरकर,सरपंच मंगेश राजगडकर,उपसरपंच,नकोडा ग्रामपंचायत,ब्रिजभूषण पाझारे, माझी जिल्हा परिषद सदस्य (समाज कल्याण), यासोबतच ग्रामपंचायत नकोडा सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ व इतर मान्यवरांसह अदानी फाउंडेशन अधिकाऱ्यांच्या (कुमारी वैशाली गुळघाणे प्रोजेक्ट ऑफिसर, सीएसआर, सौ.शुभांगी नगराळे, केंद्रप्रभारी, ASDC व गणेश डोरलीकर स्वयंसेवक) उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला.
अदानी फाउंडेशन द्वारा सुरू करण्यात आलेले आरोग्य शिबिर हे आठवड्याच्या दर रविवारला नकोडा गावामध्ये सेवा देत राहणार.