Varora taluka@ news
•मद्यपाश एक जीव घेणारा आजार यावर समर्पण समुह वरोरा चा 6 वा वर्धापन दिन संपन्न
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनीधी, वरोरा
वरोरा :अल्कोहोलिक्स अनॉनिमस समर्पण समुह, वरोरा चा 6 वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. समूहाच्या वतीने स्थानिक नेहरू उर्दू शाळा, वरोरा येथे ‘मद्यपाश एक जीव घेणारा आजार’ या विषयावर वर्धापन दिनाचे आयोजन रविवार दिनांक २ जून २०२४ ला करण्यात आलेले होते.
या सभेला मार्गदर्शक म्हणून मा. डॉ. हेमंत खापने, वरोरा, मा. डॉ. दिलीपजी बुराडे, जनरल मॅनेजर, सुरजागड माइन्स, शुभचिंतक व ए ए मित्र हे हजर होते.
सदर वर्धापन दिनामध्ये मा. डॉ. दिलीपजी बुराडे, यांनी प्रतिपादन केले की, समाजाला अल्कोहोलिक्स अनॉनिमस या संघटनेची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता आहे, तसेच मा. डॉ. हेमंत खापने, वरोरा, यांनी सुद्धा प्रतिपादन केले की, दारू ही आपल्या कुटुंबाला फार मोठ्या प्रमाणात त्रास देत असते। तसेच सदर अल्कोहोलिक्स अनॉनिमस या संघटनेशी संबंध राहील असे त्यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले।
सदर वर्धापन दिनाला अनेक बांधव, कुटुंबिय व नागरिक हजर होते.
