Home Breaking News Ghugus City @news • घुग्घुसचे नेते स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन...

Ghugus City @news • घुग्घुसचे नेते स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन • गोरगरीब महिलांना साडी वाटप

110

Ghugus City @news
• घुग्घुसचे नेते स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

• गोरगरीब महिलांना साडी वाटप

सुवर्ण भारत:पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस : शहराचे लोकप्रिय नेते स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या पुण्यतिथी निमित्त मंगळवार, १८ जुन रोजी ना. सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रात अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून उपस्थित मान्यवरांनी अभिवादन केले तसेच मौन श्रद्धांजली देण्यात आली आणि आपले विचार व्यक्त केले.

स्व. पुंडलिक उरकुडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त शहरातील गोरगरीब महिलांना ना.सुधीर मुनगंटीवार सेवा केंद्रा तर्फे साडी भेट देण्यात आली.

यावेळी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे,भाजपाचे साजन गोहने, सुरेंद्र जोगी, कोमल ठाकरे, प्रवीण सोदारी, धनराज पारखी, कुसुम भगत, ताई कामतवार, सोनाली कामतवार, सुहासिनी मांढरे, सोनी खेडेकर,निशा उरकुडे, सुनंदा लिहीतकर, पियुष भोंगळे,संदीप तेलंग, स्वाती गंगाधरे, नेहा कुम्मरवार आदींची उपस्थिती होती.