Varora taluka@ news
•बोगस विद्युत स्मार्ट मीटर योजनेचा आम आदमी पक्षाकडून. निषेध
•विद्युत महामंडळ अधिकाऱ्याला दिले निवेदन
सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनीधी, वरोरा
वरोरा : एम एस ई डी सी एल महाराष्ट्र द्वारे संपूर्ण महाराष्ट्रात सक्तीचे केले आहेत. विद्युत स्मार्ट मीटर लावण्यास महाराष्ट्रातील जनतेकडून कडाडून विरोध होत आहे. महाराष्ट्रातील जनतेचे आर्थिक शोषण करण्याचे काम महाराष्ट्र सरकार व एम एस ई डी सी एल यांच्या सहाय्यने देशातील काही भांडवलदारी कंपन्या करीत आहे. त्या अनुषंगाने आम आदमी पार्टी ने वरोरा येथे विद्युत महामंडळाच्या अधिकाऱ्याला निवेदन देऊन विद्युत स्मार्ट मीटर चा विरोध केला आहे.
भारत सरकारकडून ऑगस्ट 2021मध्ये हा कायदा भांडवलदा री कंपन्यांना फायदा व्हावा या हेतूने पारीत केल्याचे निदर्शनास येत असून जनतेवर वाढीव बोजा टाकण्याचे षडयंत्र 2021 पासून नियोजित होते.20 किलो व्हाट किंवा 27 हार्स पावर पेक्षा मी विद्युत दाब असणारे विद्युत उपभोक्ता म्हणजे सर्वसामान्य कुटुंब व गरीब जनता शेतकरी लघु उद्योजक व्यावसायिक यांच्यावर जाणीवपूर्वक अन्यायकारक धोरण ठरवून घेतलेला हा निर्णय आहे. मार्च 2025 पर्यंत विद्युत स्मार्ट मीटर लावण्याचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी प्रयत्न असून यातून फक्त आणि फक्त जनतेचे नुकसान आहे केंद्र सरकारची भूमिका ही जनहित विरोधी व भांडवलदार स्नेही आहे. संपूर्ण भारतात 22 कोटी 23 लाख विद्युत मीटर बदलाव्याचे सरकारचे उद्दिष्ट असून त्यामुळे सर्वसामान्य वीज ग्राहकांचे मोठे आर्थिक शोषण होणार आहे त्यास आम आदमी पार्टीचा विरोध आहे. महाराष्ट्रात एकूण मीटर दोन करोड 24 लाख 61 हजार 346 लागणार असून 26,939 कोटी रुपये खर्च होणार आहे. डी आय एस सी ओ एम (वितरण ) विभागाचे हे खाजगीकरणाकडे जाणारे हे धोरण असून विद्युत मार्ग सोबत अकाउंट आणि बिलिंग विभागाचे अनेक कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येऊ शकते. इथे हजारो कर्मचाऱ्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होतो. विद्युत स्मार्ट मीटरच्या नावावर विद्युत सॉरी थांबणार असा खोटा बनाव राज्य सरकार करीत आहे वास्तविकता पाहता 20 केवी पेक्षा जास्त विद्युत दबाव वापर करणाऱ्या ग्राहकाकडून हे वीज चोरी झाल्याचे बहुधा नीदर्शनास आले आहे. असे आम आदमी पार्टीने निवेदनात नमूद केले असून बोगस विद्युत स्मार्ट मीटर योजनेचा विरोध आणि निषेध केला आहे.स्मार्ट मीटर लावण्याची सक्ती थांबविण्याबाबत विद्युत महा मंडळ अधिकारी वरोरा मार्फत संचालक /सचिव एस ई डी सी एल महाराष्ट्र यांना निवेदन देण्यात आले आहे.
स्मार्ट मीटर ची सक्ती थांबवावी या करिता आम आदमी पार्टी वरोरा तर्फे आज निवेदन देण्यात आले निवेदन देते वेळे वरोरा तालुका अध्यक्ष आम आदमी पार्टी गौरव मेले , तालुका उपाध्यक्ष अमोल पिंपलशेंडे , शहर अध्यक्ष बंटी खडके , सूरज दुबे , श्रीपाद देशपांडे व कार्यकर्ते उपस्थित होते
