Chandrapur city@ news
• स्वामी समर्थ बाल योग शिबीराचा समारोप!
• सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या सुवर्णा लोखंडेंनी केले होतेय कार्यक्रमाचे आयोजन!
•समारोप कार्यक्रमाला अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती!
चंद्रपूर – किरण घाटे
स्वामी समर्थ बाल योग शिबीर गुरूकुंज उद्यान निर्माण नगर तुकुम चंद्रपूर येथे योग शिबीराचा आज समारोपीय कार्यक्रम मोठ्या उत्साहात व थाटात पार पडला . कार्यक्रमाचे उद्घाटन चंद्रपुरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते पार पडले. तर कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मनपा आयुक्त विपिन पालीवार, योगगुरू विजय चंदावार, सामाजिक कार्यात सदैव सक्रीय असणारे दिलीप वावरे , जेष्ठ नागरीक संघाचे अध्यक्ष बबनराव धर्मपरीवार ,
दिवाकर राऊतकर , कुल निर्माण समितीचे उपाध्यक्ष पुरूषोत्तम राऊत , शरद व्यास , रमेश ददगाल , विजय चिताडे व विजय लोखंडे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन करून करण्यात आली, प्रास्ताविक भाषण योग शिक्षिका सुवर्णा लोखंडे यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन या वेळी उपस्थितीतांना लाभले.योगाच्या माध्यमातुन मधूर गीतांच्या तालावर आसानांचे प्रात्यक्षिक 35 मुलांनी सादर केले. त्यांचे कौतुक करीत त्यांना सन्मान चिन्ह देण्यात आले. सोबतच गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान चिन्ह देऊन त्यांचा गौरव करण्यात आला.योगगुरू अरूणा शिरभय्ये व चंद्रपूरचे रवि इंगोले यांचा सत्कार करण्यात आला.स्वामी समर्थ मंडळातील योग शिक्षकांचा पुष्पगुच्छ देऊन या प्रसंगी सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सुरेख संचालन उज्वला करडभाजने यांनी केले. योग शिक्षिका मंजुषा निमकर, ज्योती राऊत व कविता वरभे यांच्या सहकार्यातून सदरहु कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला . उपरोक्त कार्यक्रमाचे आयोजन चंद्रपूर शहरातील सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱ्या योग शिक्षिका व गुरूकुंज उद्यान समितीच्या विद्यमान अध्यक्ष सुवर्णा लोखंडे यांनी केले होते.
