Home Breaking News Chandrapur city @news • महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप...

Chandrapur city @news • महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप ! •कार्यक्रमाला अनुश्री दहेगांवकर यांच्यासह अनेक महिलांची उपस्थिती!

152

Chandrapur city @news
• महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप !

•कार्यक्रमाला अनुश्री दहेगांवकर यांच्यासह अनेक महिलांची उपस्थिती!

चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या वतीने शहरातील तुकुम विभागात अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त गरजु विद्यार्थ्यांना शालेय साहित्यांचे वाटप करण्यात आले.तदवतंच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वतीने त्यांचा वाढदिवस थाटात साजरा करण्यात आला.सदरहु कार्यक्रम म.प्र.काँग्रेस कमिटी सेक्रेटरी अनुसूचित जाती विभागाच्या अनुश्री दहेगांवकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन वंदना वाघमारे व शालिनी लाडे यांनी केले होते. आयोजित कार्यक्रमाला रेखा बारसागडे,कुंदा गोवर्धन, अनिता दातार ,संगिता गजभिये, वाळके, कुरवाडकर उपरे व अन्य महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले . शेकडों विद्यार्थ्यांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली होती.