Home Breaking News Mul taluka@ news •सेवानिवृत्ती निमित्ताने पुष्पाताई चिताळेंचा मूल नगरीत भव्य सत्कार!...

Mul taluka@ news •सेवानिवृत्ती निमित्ताने पुष्पाताई चिताळेंचा मूल नगरीत भव्य सत्कार! अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती

131

Mul taluka@ news

•सेवानिवृत्ती निमित्ताने
पुष्पाताई चिताळेंचा मूल नगरीत भव्य सत्कार!
अनेक मान्यवर मंडळींची उपस्थिती

मूल -विशेष प्रतिनिधी

मूल येथील होमगार्ड पथकाच्या वतीने वयोमानानुसार ५८व्या वर्षी सेवानिवृत्त झालेल्या पुष्पाताई चिताळे यांचा आज रविवारला स्थानिक क्रीडा संकुलातील योगा भवनात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना शाल, श्रीफळ व साडीचोळी देऊन भव्य सत्कार करण्यात आला .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सेवानिवृत्त महसूल कर्मचारी तथा सहज सुचलं व्हाॅट्सअप गृपचे जेष्ठ सदस्य दिलीप गेडाम यांनी विभुषित केले होते.तर प्रमुख अतिथी म्हणून वासुदेव घोगरे अरुण अद्गुलवार , सिद्धार्थ रामटेके , वंदना गेडाम यांची उपस्थिती लाभली होती.सदरहु कार्यक्रमाला होमगार्ड पथकाचे पदाधिकारी, सदस्यगण या शिवाय आर. गेदेकर व चंद्रकांत रामटेके हजर होते. तत्दपूर्वी माजी प्रशासकीय अधिकारी दिलीप अरुणवार, वासुदेव घोगरे पुष्पाताई चिताळे यांना मूलच्या होमगार्ड पथका कडून मानवंदना देण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाषण सिद्धार्थ रामटेके यांनी केले .या वेळी उपस्थित मान्यवरांनी पुष्पाताई चिताडे यांच्या उल्लेखनीय कामगिरी बाबत आपले मनोगत व्यक्त करीत त्यांना आयुष्याच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या .प्रभाकर भोयर यांच्यासह होमगार्ड पथकातील बहुसंख्य महिला व पुरुष कार्यक्रमाला उपस्थित होते.उपस्थितीतांचे आभार शेंडे यांनी मानले तर या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन लोनबले यांनी केले.