Home Breaking News Korpna taluka @news •युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश कोपरणा तालुका उपाध्यक्षपदी...

Korpna taluka @news •युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेश कोपरणा तालुका उपाध्यक्षपदी निखिल पिदूरकर यांची निवड

81

Korpna taluka @news
•युवा ग्रामीण पत्रकार संघ
महाराष्ट्र प्रदेश कोपरणा तालुका उपाध्यक्षपदी निखिल पिदूरकर यांची निवड

कोरपणा :- युवा ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र कोपरणा तालुका उपाध्यक्षपदी निखिल गजानन पिदूरकर यांची निवड करण्यात आली आहे.
समाजातील प्रत्येक घटकांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर काम करणारा संघ म्हणजे युवा ग्रामीण पत्रकार संघ होय.
पिदूरकर यांनी काही वर्षांपूर्वी पत्रकारितेला सुरुवात केली. गाव प्रतिनिधी ते शहर प्रतिनिधी त्या सोबतच राजकीय क्षेत्रात अनेक पदाची जबाबदारी ते सांभाळत आहेत .सध्या ते दैनिक पब्लिक पोस्टचे कोरपणा तालुका प्रतिनिधी म्हणून काम बघत आहे.त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत त्यांना युवा ग्रामीण पत्रकार संघात कोरपणा तालुका उपाध्यक्ष पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. युवा ग्रामीण पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष गणेश कचकलवार व युवा ग्रामीण पत्रकार संघाचे महाराष्ट्र विदर्भ उपाध्यक्ष संतोष झाडे यांनी त्यांना नुकतेच नियुक्तीपत्र व ओळखपत्र दिले आहे