Chandrapur city@ news
• पोलिस प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
रेती तस्करी व घरफोड्यांच्या प्रमाणात होतेय वाढ
राजू कुडेंचे रामनगर पोलिस स्टेशनला निवेदन
चंद्रपूर -किरण घाटे
दिवसाढवळ्या रेती चोरी होत आहे इतकेच नाही तर अमली पदार्थ सेवन करणारे अल्पवयीन मुले घरफोड्या करत आहे. घरासमोरील वाहने चोरीला जात आहेत.सध्या शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असतांना कोणाचेही या कडे लक्ष नाही.पोलिसांनी या कडे तातडीने लक्ष पुरविणे गरजेचे आहे.या बाबतीत आपचे युवा नेते राजू कुडे यांनी स्थानिक रामनगर पोलिस स्टेशनला एक निवेदन सादर केले आहे.शहरातील गुन्हेगारीला तातडीने आळा घालण्याची मागणी त्यांनी सादर केलेल्या निवेदनातुन केली आहे.निवेदन देते वेळी आपचे युवा जिल्हाध्यक्ष राजू कुडे, वाहतूक महानगरचे अध्यक्ष जयदेव देवगडे, जिल्हा उपाध्यक्ष अनुप तेलतुबडे, अल्पसंख्याकचे अध्यक्ष जावेद सय्यद, व प्रशांत रामटेके उपस्थित होते.




