chandrapur city @news
•कॅन्सरग्रस्त रुग्णाला दिला महेश मेढेंनी आर्थिक मदतीचा हात
सुवर्ण भारत: किरण घाटे (उपसंपादक)
चंद्रपूर :किरण घाटे
महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे सदस्य व सामाजिक कार्यात सदैव अग्रेसर असणाऱे महेश मेंढे यांनी आज एका कॅन्सरग्रस्त रुग्णास आर्थिक मदत केली.
शिला ठेमस्कर या अत्यंत गरीब असून त्यांची आर्थिक परिस्थिती बेताची आहे दरम्यान त्या कॅन्सरने आजारी असल्याची माहिती मेंढे यांना मिळाली.इतकेच नाही तर त्यांना मदतीची अत्यंत गरज असल्याचे त्यांना कळले. मेंढे हे ग्रामीण भागात कामात व्यस्त असतांना आरोग्याविषयी मदतीसाठी त्यांना फोन आला .त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता ते मदतीसाठी धावून आले.
मेंढे यांनी शीला ठेमस्कर या कॅन्सर पीडित महिलेला धीर देत आर्थिक सहाय्य केले.कुटूंबियांची या वेळी सहानुभूतीने विचारपूस केली.मुलींच्या शिक्षणाकरिता मदत लागल्यास मदत करण्याचे देखील त्यांनी त्या कुटुंबाला आश्वासन दिले.
यानिमित्ताने का होईना मेंढे यांची आरोग्य व शिक्षणाविषयी असणारी एक तळमळ दिसून आली.मेंढे हे नेहमीच शालेय विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप, सार्वजनिक कार्यक्रमात रवा साखर,भोजनदान तसेच पावसाळ्यात गरीब आणि गरजू जनतेला छत्री वाटप कार्यक्रम करीत असतात या शिवाय गरजूंना ते आर्थिक मदत करीत असल्याचे दिसून येतात .
आज मात्र प्रत्यक्षात आरोग्यासाठी सर्व कामाचा व्याप सोडून ते मदतीसाठी तत्परतेने धावून आल्याचे प्रत्यक्षात दिसून आले. मेंढे यांचे कार्याचे सर्वांनी कौतुक करीत त्यांच्या या कामाला दाद दिली.
यावेळी महेश मेंढे यांच्या सोबत वैशाली गेडाम,गौतम गेडाम,चरणदास दुर्गे,बापूजी पिंपळे,शिशिम पाटील व,बादल रामटेके यांची उपस्थिती होती.


