Home Breaking News Beed dist @news पत्रकारास धमकी देणाऱ्या अवैद्य दलालावर कारवाई करण्याची पत्रकारांची...

Beed dist @news पत्रकारास धमकी देणाऱ्या अवैद्य दलालावर कारवाई करण्याची पत्रकारांची तहसीलदार यांच्याकडे मागणी—

149

Beed dist @news

पत्रकारास धमकी देणाऱ्या अवैद्य दलालावर कारवाई करण्याची पत्रकारांची तहसीलदार यांच्याकडे मागणी—

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

केज येथील पत्रकारास धमकी देणाऱ्या अवैद्य दलालावर कारवाई करण्यात यावी या मागणीचे लेखी निवेदन केजचे तहसीलदार सचिन देशपांडे यांना केज येथील पत्रकार बांधवांनी दिले आहे .
याबाबतची सविस्तर माहिती अशी की, सध्या महाराष्ट्र शासनाकडून मुख्यमंत्री बहिण माझी लाडकी ही योजना सुरू करण्यात आली असून त्या संदर्भातील कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी तालुक्यातून मोठ्या प्रमाणात महिला, पुरुष यांनी तहसील कार्यालयात गर्दी केली आहे.त्याचाच गैरफायदा घेऊन तहसील कार्यालयाच्या परिसरात अवैद्यरित्या लिखापडीचे काम करणारे दलाल यांनी सर्वसामान्यांची अव्वांच्या सव्वा पैसे घेऊन आर्थिक लूट सुरू केली आहे .
त्या संदर्भात दैनिक समर्थ राजयोगचे केज तालुका प्रतिनिधी चंद्रकांत पाटील यांनी सदर विषयाची बातमी वरील दैनिकातून प्रसिद्ध केल्यामुळे तहसील कार्यालयाच्या परिसरात अवैद्यरित्या काम करणारा वैभव मोहन चाटे यांनी त्याच्या स्वतःच्या मोबाईल नं.९०७५९१४७९८ या क्रमांका वरून पत्रकार चंद्रकांत पाटील यांच्या ९३२५७०५४५८ या मोबाईल नंबरच्या व्हाट्सॲप वर चॅटिंग करून अपमानास्पद शब्द वापरून चॅटिंग करून अपमानित करून धमकी दिली आहे .
तरी लवकरात लवकर धमकी देणाऱ्या वैभव मोहन चाटे नामक व्यक्ती विरुद्ध पत्रकार हल्ला विरोधी कायद्या अंतर्गत कारवाई करण्यात यावी. व केज तहसील कार्यालयाच्या परिसरात अवैद्यरित्या लिखापडीचे व कागदपत्रे विक्री करणाऱ्या व्यक्तींना या परिसरात बसू देऊ नये. व त्यांनी आपली दुकाने थाटल्यास त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी. अशी मागणी लेखी निवेदनाद्वारे केज येथील पत्रकार बांधवांनी तहसीलदार सचिन देशपांडे यांच्याकडे केली आहे. सदर मागणीचे निवेदन तहसीलदार सचिन देशपांडे यांनी स्वीकारले आहे.या लेखी निवेदनावर पत्रकार चंद्रकांत पाटील, तात्या गवळी, धनंजय कुलकर्णी, रंजीत घाडगे, वसंत सोनवणे, सनी शेख, महादेव काळे, मुबशीर खतीब, श्रीराम तांदळे, महादेव गायकवाड इत्यादी पत्रकार बांधवांच्या स्वाक्षऱ्या आहेत .