Ballarpur City@ news
• बल्लारपूर नगरीतील मालू कपडा दुकानावर पेट्रोल बॉम्ब हल्ल्यासह गोळीबार!
• अख्ख्या चंद्रपूर जिल्ह्यात उडाली खळबळ!
• जिल्ह्यात वाढतेय गुन्हेगारीचे प्रमाण ?
सुवर्ण भारत:किरण घाटे (उपसंपादक)
बल्लारपूर: चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बल्लारपूर शहरातील मालू वस्त्र भांडार नामक दुकानावर आज पेट्रोल बॉम्बने हल्ला करून गोळीबार केल्याने एकच खळबळ उडाली असल्याचे ताजे वृत्त आहे .दरम्यान या गोळीबारात दुकानात कार्यरत असलेल्या नोकराच्या एका पायाला गोळी लागली आहे, शहरातील सर्वात मोठ्या वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या दुकानावर अज्ञात व्यक्तींद्वारे रविवारी दुपारी 12.00 वाजताच्या सुमारास झालेल्या पेट्रोल बॉम्ब हल्ला व गोळीबारामुळे स्थानिक जनतेत भीतीचे वातावरण निर्माण झाले असल्याचे दिसून येते.
गोळीबारात दुकानातील एका नोकराच्या पायाला गोळी लागल्याने त्याला तात्काळ चंद्रपूरला हलविण्यात आल्याचे सांगण्यात येत असून पोलिसांनी CCTV फूटेज तपासून त्या दिशेने तपास सुरू केला आहे. जुण्या वैमनस्यातून हे प्रकरण घडले असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून मालू यांचे दुकान मागे शार्टसर्किट मुळे जळाले होते .ते परत नव्याने बांधून सुरू केले होते मात्र आता पुन्हा पेट्रोल बॉम्ब हल्ला करून दुकानाच्या काचा फोडल्या गेल्याची माहिती आहे.