Home Breaking News Varora city@ news • नगरपरिषद जवळ रस्त्यालगत कचऱ्याचे साम्राज्य •साचलेल्या सडक्या...

Varora city@ news • नगरपरिषद जवळ रस्त्यालगत कचऱ्याचे साम्राज्य •साचलेल्या सडक्या घनकचऱ्याची दुर्गंधीमुळे रोगराई होण्याची शक्यता

118

Varora city@ news
• नगरपरिषद जवळ रस्त्यालगत कचऱ्याचे साम्राज्य

•साचलेल्या सडक्या घनकचऱ्याची दुर्गंधीमुळे रोगराई होण्याची शक्यता

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनीधी, वरोरा

वरोरा : वरोरा शहराला भेदसाविणाऱ्या समस्यांचे निवारण करण्याचे दायित्व हे नगरपरिषद प्रशासनाकडे असते. परंतु कुंपणच शेत खातात या म्हणीप्रमाणे ज्या नगरपालिकेकडे शहर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी असताना नगरपालिकेजवळील रहादारीचे रस्त्या लगत घनकचरा साठलेला आहे. त्या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचा विसर पालिकेच्या स्वछता विभागाला पडला आहे.ही खेदाची बाब आहे.पावसाळा सुरु असून साठलेला कचऱ्याची दुर्गंधी सुटल्यामुळे परिसरात रोगराई पसरण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे. कुठे गेले पालिका प्रशासन आणि नेमके स्वच्छता विभाग काय करीत आहे? असें सवाल नागरिक करीत आहे. नागरिकांचे आरोग्य बिघडले तर याला जबाबदार पालिका प्रशासन की नागरिक असाही प्रश्न उपस्थित होतो आहे.
शहरात अनेक समस्या आवासून उभ्या आहेत परंतु नगरपालिका प्रशासनाने आकार्यक्षमतेची हद्द पार केली आहे. त्यांना समस्याशी काही देणे घेणे नाही असें म्हणणे वावगे ठरणार नाही.नुकतेच मालवीय वार्डातील चार वर्षाच्या मुलाचा दूषित पाण्यामुळे मृत्यू झाल्याची चर्चा सुरु आहे. समस्येनी त्रस्त आणि ग्रस्त असलेल्या नागरिकांचा आरोप आहे की, या नगरपालिकेपासुन सुमारे 100 मीटर अंतरावर असलेल्या मठ एरिया रस्त्याचे बाजूला कचरा टाकल्या जात असल्याने दुर्गंधी पसरत आहे. सदर कचऱ्यामुळे नागरिक त्रस्त असतानाही हा कचरा उचलून कचरा डेपोपर्यंत नेण्याची तसदी आतापर्यंत पालिका प्रशासनाने का दाखविली नाही. वरिष्ठ प्रशासनाने लक्ष घालून वरोरा शहराच्या गंभीर समस्या सोडवाव्या अशी मागणी होत आहे.