Home Breaking News Ballarpur city @news • लेखनी बंद आंदोलनात बल्हारपूरचे महसूल कर्मचारी सहभागी! ...

Ballarpur city @news • लेखनी बंद आंदोलनात बल्हारपूरचे महसूल कर्मचारी सहभागी! • चंद्रपूर जिल्ह्यात आंदोलन १००टक्के यशस्वी ! • रास्त मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन!

182

Ballarpur city @news
• लेखनी बंद आंदोलनात बल्हारपूरचे महसूल कर्मचारी सहभागी!

• चंद्रपूर जिल्ह्यात आंदोलन १००टक्के यशस्वी !
• रास्त मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी केले आंदोलन!

बल्लारपूर (चंद्रपूर) किरण घाटे

शासन दरबारी ब-याच वर्षांपासून राज्य महसूल कर्मचारी वर्गांच्या रास्त मागण्या खितपत पडल्या असून त्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काल शुक्रवारी बल्हारपूर तहसिल कार्यालयाच्या महसूल कर्मचा-यांनी लेखनी बंद आंदोलन पुकारले! या आंदोलनाला शंभर टक्के प्रतिसाद मिळाल्याचा दावा महसूल कर्मचारी संघटनेचे गजानन उपरे यांनी केला आहे.दरम्यान येत्या सोमवारी होवू घातलेल्या बेमुदत संपात चंद्रपूर जिल्ह्यातील महसूल कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होत असल्याचे दीपक वडूळे यांनी आज चंद्रपूर मुक्कामी एका भेटी दरम्यान सांगितले.कालच्या लेखनी बंद आंदोलनात नायब तहसिलदार सतिश साळवे, ना.त.चंद्रशेखर वेटे , ना.त.अजय मल्लेवार, नायब तहसिलदार रश्मि बाबरे,अव्वल कारकून गजानन उपरे ,प्रफूल नारनवरे,संगिता खारकर , निकीता रामटेके, अनिता तलांदे, मीरा थूल शोभा मुंडरे प्रेमिला दडमल , आदेश पेटकर,प्राची गुज्जनवार आदि सहभागी झाले होते.