Home Breaking News Beed dist @news •अंगदान (Oragan Donation)जागरूकता अभियानाचा महेश आयुर्वेद कॉलेज- हॉस्पिटलमध्ये...

Beed dist @news •अंगदान (Oragan Donation)जागरूकता अभियानाचा महेश आयुर्वेद कॉलेज- हॉस्पिटलमध्ये उत्साहात प्रारंभ —

61

Beed dist @news

अंगदान (Oragan Donation)जागरूकता अभियानाचा महेश आयुर्वेद कॉलेज- हॉस्पिटलमध्ये उत्साहात प्रारंभ —

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

आष्टी येथील शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, महेश आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल मध्ये अंगदान(Oragan Donation) जागरूकता अभियानाचा उत्साहात प्रारंभ झाला असून , या प्रसंगी पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक विद्यालय/पंडीत जवाहरलाल नेहरु प्राथमिक विद्यालय/गंगुबाई प्राथमिक विद्यालयातिल विद्यार्थी / सर्व शिक्षक यांना महेश आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटलच्या डॉ. मोहिनी गोसावी , डॉ. राहुल काळे व विद्यार्थी शोएब शेख , प्रेरणा राठोड,अथर्व पुलदाळे,ऋषिकेश खराटे यांनी अवयवदानाबद्दल (Oragan Donation) माहिती दिली असून , कॉलेजमध्ये ३ ऑगस्ट पर्यंत रांगोळी स्पर्धा , निबंध स्पर्धा , वकृत्व स्पर्धा , घोषवाक्य स्पर्धा , कविता स्पर्धा , पथनाट्य अशाप्रकारे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून , ३ ऑगस्ट रोजी अवयव दान जनजागृती रॅली चे आयोजन करण्यात आलेले आहे .
या कार्यक्रमासाठी प्राचार्य सुरेश बोडखे , मुख्याध्यापक ज्ञानेश्वर राऊत , मुख्याध्यापक संजय घुमरे , शिक्षक , विद्यार्थी व महेश आयुर्वेद कॉलेज व हॉस्पिटल चे सर्व प्राध्यापक , विद्यार्थी उपस्थित होते .