Home Breaking News Ghugus city @News •घुग्घुस येथील अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्तांना लवकरात-लवकर जमिनीचे पट्टे मंजुर...

Ghugus city @News •घुग्घुस येथील अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्तांना लवकरात-लवकर जमिनीचे पट्टे मंजुर करा:जयंत जोगी

185

Ghugus city @News
•घुग्घुस येथील अमराई वार्डातील भूस्खलनग्रस्तांना लवकरात-लवकर जमिनीचे पट्टे मंजुर करा:जयंत जोगी

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याशी चर्चा करण्यात आले की,गेल्या दिड वर्षापासून अमराई वार्ड क्र.१ येथील भूस्खलनग्रस्तांचे अजुनपर्यंत पुनर्वसन झालेली नाही,भूस्खलनग्रस्त भागात ज्या नागरिकांची घरे आलेली आहे.ते आजही किरायाच्या घरामध्ये गेल्या दिड वर्षापासून राहत आहे,असे निवेदनातून तसेच चर्चा करुन भूस्खलनग्रस्तांना लवकरात-लवकर जमिनीचे पट्टे मंजुर करण्यात यावे.सोबतच गेल्या दिड वर्षापासून किरायाच्या घरामध्ये राहत असल्यामुळे त्यांना वेकोलि करुन पुनर्वसनची प्रतिक्रिया पुर्ण होत पर्यंत ३००० रु.प्रति महिना त्वरित लागु करण्यात यावा.

तसेच त्वरित खासदार प्रतिभा धानोरकर यांनी दुसऱ्याच दिवशी दि.१६ जुलै २०२४ मंगळवार रोजी सांयकाळ ५ वाजता जिल्हाधिकारी भेट घेऊन भूस्खलनग्रस्तच्या नागरिकांची समस्या मांडण्यात आली,आणि त्वरीत समस्या मंजुर करण्यात येणार आली आहे,असे काँग्रेस नेते जयंत जोगी,गणेश उईके कडून सांगण्यात आली.

याप्रसंगी माजी जिल्हापरिषद सदस्य जयंत जोगी,माजी सरपंच शोभाताई ठाकरे,माजी शहर अध्यक्ष (काँग्रेस) जावेद सिद्दीकी,माजी ग्रामपंचायत सदस्य ममता खैरे,गणेश ऊइके, काँग्रेस (कमिटी) तालुकाध्यक्ष राजकुमार वर्मा, अनुसूचित जाती शहर अध्यक्ष विक्रम गोगला,काँग्रेस कमिटी
शहर महासचिव पवन नागपूरे,सुधाकर वाघमारे,छाया पासवान,शोभा कोटांगले,शोभा मुरपेल्लीवार,गौरीशंकर वाढई अमराई वार्डातील अनेक नागरिक उपस्थित होते.