Home Breaking News Ghugus City @news •आषाढी एकादशी निमित्त घुग्घूस ते वढा पायदळ वारी ...

Ghugus City @news •आषाढी एकादशी निमित्त घुग्घूस ते वढा पायदळ वारी •काँग्रेस तर्फे वारकऱ्यांचे स्वागत व चहा – पाणी

421

Ghugus City @news
•आषाढी एकादशी निमित्त घुग्घूस ते वढा पायदळ वारी

•काँग्रेस तर्फे वारकऱ्यांचे स्वागत व चहा – पाणी

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घूस : देवशयनी आषाढी एकादशी निमित्त समस्त गावकरी मंडळी व तेली समाज बहुउद्देशीय संस्था घुग्घूस यांच्या वतीने गांधी चौकशी घुग्घूस येथून दिनांक 17 जुलै रोजी सकाळी नऊ वाजता वारी विदर्भाची काशी तीर्थक्षेत्र वढा करीता भजन मंडळ टाळ मृदूंग व विठ्ठल नामाच्या गजरात निघाली

सदर वारीचे काँग्रेस कार्यालया समोर काँग्रेस अध्यक्ष राजुरेड्डी यांच्या वतीने स्वागत करण्यात आले व वारकऱ्या करीता चहा पाण्याची व्यवस्था करण्यात आली याप्रसंगी काँग्रेस नेते सैय्यद अनवर, अलीम शेख, सोशल मीडिया अध्यक्ष रोशन दंतलवार, रोहित डाकूर, सुनील पाटील, दिपक पेंदोर,कपिल गोगला,थामस अर्नाकोडा,अंकुश सपाटे,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते