Home Breaking News Chandrapur city@ news • आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल – रुक्मिणीचे आमदार किशोर...

Chandrapur city@ news • आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल – रुक्मिणीचे आमदार किशोर जोरगेवार विठ्ठल मंदिरात घेतले दर्शन

123

Chandrapur city@ news
• आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल – रुक्मिणीचे आमदार किशोर जोरगेवार विठ्ठल मंदिरात घेतले दर्शन

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

चंद्रपूर : २५० वर्षे पुरातन असलेल्या विठ्ठल मंदिर येथे जाऊन विठ्ठल – रुक्मिणीचे सपत्नीक दर्शन घेतले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊन सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. शेतकरी बांधवांना यश दे, समृद्धी प्रदान कर, अशी प्रार्थना यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी केली.

या पवित्र स्थळाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी हजारो भाविक येथे येतात. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिरात भक्तांची मोठी गर्दी जमलेली असते. आजच्या या पवित्र दिवशी आमदार किशोर जोरगेवार यांनी सपत्नीक मंदिरात येऊन विठुरायाच्या चरणी माथा टेकला आणि जनतेच्या सुख, शांती आणि समृद्धीची प्रार्थना केली.

यावेळी विठ्ठल यंग चांदा ब्रिगेड आदींची पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थिती होती.