Home Breaking News Wardha dist@ News •Aarvi @सावळापूर जंगल शिवारात गावठी मोहा दारू भट्टीवर...

Wardha dist@ News •Aarvi @सावळापूर जंगल शिवारात गावठी मोहा दारू भट्टीवर छापा…. • आर्वी पोलिसांची कारवाई 2,20,900/- रु मुद्देमाल जप्त

26

Wardha dist@ News

•Aarvi @सावळापूर जंगल शिवारात गावठी मोहा दारू भट्टीवर छापा….
• आर्वी पोलिसांची कारवाई 2,20,900/- रु मुद्देमाल जप्त

सुवर्ण भारत:अर्पित वाहाणे
उपजिल्हा प्रतिनीधी,वर्धा

आर्वी: पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सावळापूर जंगल शिवारात गाव नदीच्या काठावर आर्वी येथील पोलीस पथकाने प्रोव्हीशन रेट केला असता विक्की गौतम सोमकुवर वय २५वर्ष राहणार सावळापूर आरोपी क्रमांक दोन संजय संजय बापूरावजी दाबणे वय 35 वर्षे राहणार सावळापूर ता. आर्वी जि वर्धा असे संगमत करून अवैधरित्या गावठी मोहा दारूचे गायन करताना पोलीस पथकाला आढळून आले.

त्यावेळी मोक्यावरून ३ मोठ्या लोखंडी ड्रम व १२ लहान प्लास्टिक ड्रम मध्ये ६ प्लास्टिक डबकी मध्ये एकूण 1800 लिटर कच्चा गावठी मोहा सडवा रसायन तसेच 200 लिटर उकळता मोहा सळवा रसायन व ९० लिटर गावठी मोहा दारू असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून नष्ट केला.
प्लास्टिक टपरीमध्ये 90 l गावठी मोह दारू ,3 लोखंडी ड्रम, 12 प्लास्टिक ड्रम 6 प्लास्टिक डक क्या जर्मन घमिले , जळाऊ लाकडे . नेवार पट्टी, प्लास्टिक पाईप व इतर भट्टी साहित्य तसेच एक mi redmi कंपनीचा अँड्रॉइड मोबाईल असा एकूण किंमत दोन लाख वीस हजार नऊशे(२,२०,९००.₹) रुपयाचा मुद्देमाल आरोपीच्या ताब्यातून पंचा समक्ष आरोपी कडून आर्वी पोलिसांनी जप्त करून नष्ट करण्यात आला. आरोपी विकी गौतम सोमकुवर, संजय दाबणे दोन्ही राह. सावळापुर त. आर्वी जीं वर्धा यांना ताब्यात घेऊन यांचे विरुद्ध कलम 65.B .C E.F.83 महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक नूरुल हसन,अप्पर पोलिस अधिक्षक सागर कवडे, यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी डी.सी खंडेराव, प्रभारी पोलिस निरीक्षक महेश भोरटेकर, यांचे निर्देशनात आर्वी पोलीस स्टेशन चे पोलिस हवलदार दिगंबर रुईकर , अमर हजारे,पोलिस शिपाई राहुल देशमुख , निलेश करडे, स्वप्नील निकुरे आदींनी करत आहे.