Home Breaking News • दागिन्याची चोरी करणारी टोळी अटकेत वरोरा पोलिसांची कारवाई • सहा लाख...

• दागिन्याची चोरी करणारी टोळी अटकेत वरोरा पोलिसांची कारवाई • सहा लाख 85000 चा मुद्देमाल जप्त

93

Varora city @news
• दागिन्याची चोरी करणारी टोळी अटकेत
वरोरा पोलिसांची कारवाई
• सहा लाख 85000 चा मुद्देमाल जप्त

सुवर्ण भारत: खेमचंद नेरकर
तालुका प्रतिनिधी, वरोरा

वरोरा :तालुक्यातील टेमुरडा येथे 17 जुलैला शरद घुगाने यांच्या चहा च्या दुकानात चोरीची घटना घडली या
घटनेची तक्रार वरोरा पोलीस स्टेशनला प्राप्त होताच वरोरा पोलीस स्टेशनची डीबी पथकाने स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन कोरपणा यांच्या मदतीने सहा आरोपींना ताब्यात घेत त्यांच्याकडून सहा लाख 85000 चा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
संदीप संजय शेरकुरे आकाश नारायण शेरकुरे, चिंतामण संजय शेरकुरे दोन महिला सर्व राहणार पारधी टोला,डॉक्टर विकास काळे राहणार चिनोरा पारधी गुडा ता. वरोरा अशी आरोपीची नावे आहेत.

…. वरोरा तालुक्यातील टेमुरडा येथे
शरद गुघाने यांचे चहाचे दुकान आहे 17 जुलैला ते दुकानचे शटर उघडे करून झोपले असताना अग्यात आरोपिनी त्यांच्या चहाच्या दुकानातील 269 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे सहा लाख 85 हजार, एक लाख नगदी, आठ हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण 6 लाख 85000 रुपयाचा माल चोरून नेला. याबाबत गुघाने यांनी 19 जुलैला वरोरा पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली त्यांच्या तक्रारीवरून कलम 305 भारतीय न्याय संहिता प्रमाणे तक्रार दाखल करून वरोरा पोलिसांनी तपासात सुरुवात केली. व 24 तासात आरोपींना अटक करून मुद्देमाल जप्त केला अटक केलेल्या आरोपीकडून आठ सोन्याच्या अंगठ्या,चार सोन्याच्या बांगड्या,एक सोन्याची चपला कंठी एक जोड सोन्याचे कानातले दोन सोन्याची पोत, एक सोन्याचा गोफ असे एकूण सोने, दोन मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली शिवरलेट स्पार्क कार क्रमांक एम एच 34 ए ए 33 24 तसेच गुन्ह्यात वापरलेली एक्टिवा क्रमांक एम एच 31 ई व्ही 91 88 असा सहा लाख 85000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच फरारी आरोपींना अटक करून उर्वरित मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे.
सदर आरोपीना न्यायालयाने 19 जुलै ला अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने 24 जुलै पर्यंत आरोपींना पोलीस कोठडी ठेवण्याचे आदेश दिले होते.24जुलै ला आरोपीना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याचे आदेश दिले.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक मुमुक्का सुदर्शन अप्पर अधीक्षक रीना जनबंधू सहाय्यक पोलीस अधीक्षक वरोरा नयोमी साटम स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार, वरोरा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अजिंक्य तांबडे,सहा.पोलीस निरीक्षक विनोद जांभळे, स्थानिक गुन्हा शाखा चंद्रपूरचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज गदादे,कोरपणा पोलीस स्टेशन सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास गायकवाड तसेच वरोरा पोलीस स्टेशन डिबी पथकातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपक दुधे,संदीप मुळे, विशाल राजुरकर, महेश गावतुरे, मोहन निषाद,राजू लोधी यांनीl स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस स्टेशन कोरपना येथील पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने अटक करण्यात आली