Home Breaking News Ballarpur taluka@ News Visapur @विवाहित युवकाची गळफास लावून आत्महत्या विसापूरगावाची घटना

Ballarpur taluka@ News Visapur @विवाहित युवकाची गळफास लावून आत्महत्या विसापूरगावाची घटना

255

Ballarpur taluka@ News
Visapur @विवाहित युवकाची गळफास लावून आत्महत्या विसापूरगावाची घटना

सुवर्ण भारत शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर :- तालुक्यातील विसापुर येथे विवाहित युवकाने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.
विसापुर येथील वार्ड क्रमांक ५ मधील रहिवासी विजय पुंडलिक चुधरी वय ३० वर्ष हा आपल्या सासरा विलास टोंगे यांचा घरी रुमाल ने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक २४ जुलै बुधवारला दुपारी १ वाजता उघडकीस आली. त्याची पत्नी माधुरी त्याच्या कडील मोबाईल वरून नातेवाईकाला फोन करण्यासाठी गेली असता तेंव्हा तो रुमालीने गळफास घेतलेल्या अवस्थेत तिला दिसला.त्याची धुकधुकी सुरू असल्याच्या स्थितीत तिला दिसलां. तिने आरडा ओरडा करून घर शेजारी राहणाऱ्या जवळच्या नातेवाईकाला बोलावले त्याला गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले असता तिथे पोहाचण्या पूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली होती. घटनेच्या दिवशी बुधवारला तो आपली पत्नी माधुरीला व सासूला चाकुल्या खाण्याची आवड झाल्याने बनवायला सांगितले व झाल्यावर सांगा मी येतो म्हणून जुन्या घरी आराम करायला गेला होता. विजय घरजावई म्हणून मागील काही वर्षांपासून सासरला विलास टोंगेकडे राहायचा आणि वाहनचालक म्हणून चंद्रपूर येथे काम करत होता.
या बाबतची माहिती विसापूर पोलीस चौकी यांना देण्यात आली. त्यांनी मर्ग दाखल करून पंचनामा केले व मृतदेह शवविच्छेदन करण्याकरिता बल्लारपूर ग्रामीण रुग्णालयात पाठविले घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांच्या मार्गदर्शनाखाली विसापुर पोलीस चौकी चे पोलीस हवालदार दुष्यांत गोडबोले करीत आहे.