Home Breaking News Ghugus City @News • ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिराच्या...

Ghugus City @News • ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिराच्या नियोजनाची बैठक

38

Ghugus City @News
• ना. सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिराच्या नियोजनाची बैठक

सुवर्ण भारत: पंकज रामटेके
सहाय्यक जिल्हा प्रतिनीधी, चंद्रपूर

घुग्घुस : येथील सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात मंगळवार २३ जुलै २०२३ मंगळवार रोजी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिर (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) संदर्भात नियोजनाची बैठक पार पडली.

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवार, ३० जुलै रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत घुग्घुस येथील केमिकल नगर वार्डातील प्रयास सभागृहात भव्य महाआरोग्य शिबीर (मोफत रोगनिदान व शस्त्रक्रिया) चे आयोजन करण्यात आले आहे.

सोबतच राजुरा व पोंभूर्णा येथे सुद्धा भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन राजुरा विधानसभा निवडणूक प्रमुख तथा जि. प. चे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.

घुग्घुस व पोंभुर्णा येथील महाआरोग्य शिबिराचे हे सलग ९ वे वर्ष आहे तर राजुरा शहरात पहिल्यांदाच भव्य महाआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

त्याअनुषंगाने ना. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रात भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांच्या नेतृत्वात भव्य महाआरोग्य शिबिराच्या नियोजनासाठी बैठक घेण्यात आली याप्रसंगी भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे यांनी नियोजना संदर्भात मार्गदर्शन केले तसेच विविध विषयावर चर्चा करण्यात आली.

यावेळी प्रयास सखी मंच अध्यक्षा किरण बोढे, माजी जि. प. सभापती नितु चौधरी,माजी ग्रामपंचायत सदस्य सिनू इसारप, पुजा दुर्गम, सुचिता लुटे,नंदा कांबळे,साजन गोहने,सरिता इसारप,सुषमा सावे, जिल्हा सचिव विनोद चौधरी, मल्लेश बल्ला, अमीना बेगम, सुनीता पाटील व मोठया संख्येत महिला उपस्थित होत्या.