Home Breaking News Beed dist @news• शिरूरमध्ये जनसंपर्क अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद—- •...

Beed dist @news• शिरूरमध्ये जनसंपर्क अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद—- • शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध:माजी आ. भीमराव धोंडे

32

Beed dist @news•

शिरूरमध्ये जनसंपर्क अभियानास उत्स्फूर्त प्रतिसाद—-

शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी कटीबद्ध:माजी आ. भीमराव धोंडे

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

शिक्षकांना जुन्या पेन्शन प्रमाणे पेन्शन योजना लागू करणे, जि. प. शिक्षकांच्या रिक्त जागा भरणे, पदोन्नतीचा प्रश्न मार्गी लावणे तसेच शिक्षकांचे इतर प्रश्न सोडविण्यासाठी मी बीड पासुन ते मंत्रालयापर्यंत प्रयत्न करील असे आश्वासन माजी आमदार भीमराव धोंडे यांनी शिरूर कासार येथे शिक्षक परिषदेत बोलताना दिले .
आष्टी /पाटोदा /शिरूर /विधानसभा मतदारसंघातील सर्व सामान्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी माजी आ. भीमराव धोंडे यांनी गुरुवार दिनांक २५ जुलै रोजी जनसंपर्क अभियाना अंतर्गत शिरूर कासार शहर / बाजारपेठेत फिरून लोकांच्या भेटी घेऊन व वृद्धांशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. जनसंपर्क अभियान दौऱ्याच्या निमित्ताने माजी आ. भीमराव धोंडे यांचे ठिकठिकाणी वाजतगाजत व तोफा वाजवुन स्वागत करण्यात आले. असुन, आष्टी/ पाटोदा/कडा नंतर शिरूर शहरातील दौऱ्याला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला .
जि.प. शाळेत शिरूर केंद्राच्या शिक्षण परिषदेत पुढे बोलताना माजी आमदार भीमराव धोंडे यांनी सांगितले की, मी विधानसभा सदस्य असताना शिरूर येथील जि. प. शाळा बांधकामांसाठी निधी उपलब्ध करून दिला होता . इमारतीचे भूमिपूजन व उद्घाटन माझ्याच हस्ते झाले होते. शिक्षकांना समाजात अनन्यसाधारण महत्त्व आहे. शिक्षकांमुळेच माणसांची जडणघडण होते. आमच्या शेतकरी शिक्षण संस्थे मधून आतापर्यंत हजारो शिक्षक व इतर अधिकारी घडले आहेत. शिरूर तालुका पुर्वी आष्टी मतदारसंघात नव्हता त्यामुळे या भागाचा संस्थेच्या माध्यमातून शैक्षणिक विकास करता आला नाही परंतु भविष्यात शिरूर तालुक्यात शैक्षणिक संस्था सुरू करण्याचा मानस भिमराव धोंडे यांनी व्यक्त केला. शिक्षकांमुळेच जिल्ह्याचा शैक्षणिक दर्जा चांगला आहे. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्यासाठी मी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे . शिरूर तालुका शिक्षक पतसंस्थेचे काही भागभांडवल पाटोदा तालुका शिक्षक पतसंस्थेत गुंतलेले आहे ते मिळवुन देण्याची मागणी शिक्षकांनी केली त्यासाठी प्रयत्न करु असे भिमराव धोंडे यांनी सांगितले . शाळेच्या वतीने माजी आ. भिमराव धोंडे व अजयदादा धोंडे व इतरांचे मुख्याध्यापक खेडकर, मुख्याध्यापक मिसाळ, बाळासाहेब सिरसाठ यांनी स्वागत केले. दौऱ्यामध्ये भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस अजयदादा धोंडे,किशोर खोले, माऊली पानसंबळ,सरपंच ज्ञानदेव केदार, एम.एन. बडे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते . शिरूर तालुक्यातील मानूर येथे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी कार्यकर्त्यांसोबत हाॅटेलमध्ये चहा घेतला. शिरुर येथील थोरात वस्तीवर भेट दिली असून, माजी आ.भिमराव धोंडे यांचे हस्ते लक्ष्मीमातेची पुजा करण्यात आली. दिवसभर पावसाची रिपरिप चालु असताना सुद्धा त्या वातावरणात माजी आमदार भीमराव धोंडे यांनी शिरुर शहराचा दौरा केला असून, ग्रामस्थांनी देखील उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . अभियाना दरम्यान माजी नगरसेवक सुनिल पाटील , बबनराव घोरपडे, पिनु बागल, हारुन आतार , सुधीर भांडेकर, वेदपाठक यांचे अमोल सुवर्णकार, कालिका स्टील सेंटर, सुभाष काटकर, दत्ता भुजबळ, शिलाताई शेलार,काळे दाजी,चोरमले, अभिलेश गाडेकर, रोहिदास गायके, कैलास गायके, गफुरभाई, गोविंद वखरे, बबनराव खामकर,उद्धव खेडकर, शंकरराव कातखडे, रामनाथ खेडकर, विजय गिरी,लखुळ मुळे,कांतीलाल देसरडा, शशिकांत बांगर,सत्तारभाई, ए. टी. राख व इतरांच्या निवासस्थानी भेटी दिल्या असून, तसेच ज्योती क्रांती क्रेडिट सोसायटीस भेट दिली. सुभाष सोनवणे यांच्या मातोश्री निधन झाले तसेच बाबु संकोड यांच्या मुलीचे निधन झाले या दोन्ही कुटुंबांची भेट घेऊन सांत्वन केले.

ठिकठिकाणी झालेल्या भेटी दरम्यान , सरपंच अशोक पाखरे, जेष्ठ नेते दशरथ दादा वनवे, पोपट सिरसाठ, विठ्ठल वनवे, प्रल्हाद बडे, सुभाष सिरसाठ, अमोल पवार, पोपट बेळगे, भगवान पाखरे, मोहबत पठाण, सुर्यकांत बागल, रंगनाथ जाधव, बाबुराव झिरपे, खुदा शेख, शेरखान पठाण, अभीलाश गाडेकर, प्रल्हाद बडे, सुभाष सिरसाठ, अमोल पवार, पोपट बेळगे, भगवान पाखरे, मोहबत पठाण , पांडू थोरात, संदीपान राजगूडे, बबन थोरात, कैलास थोरात,अमर माळी , विजय थोरात, गोकुळ थोरात, उस्मान आतार, महारुद्र खेडकर,हारुन शेख,माजी उपसरपंच ढाकणे, अभिजित डंगूरवाला, संतोष सानप, प्रमोद दगडे, यासिनभाई, डॉ. निळेकर, डॉ. सानप, काळे दाजी,चोरमले, कैलास गायके, बबन खामकर, बाळासाहेब बांगर,आकाश खामकर सह आदीं जन या प्रसगि उपस्थित होते .