Home Breaking News Chandrapur Dist@News •ना.सुधीर मुनगंटीवारांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राबविणार भारतीय जनता...

Chandrapur Dist@News •ना.सुधीर मुनगंटीवारांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राबविणार भारतीय जनता युवा मोर्चा जनसेवा कार्यक्रम महेश देवकतेंचा पुढाकार

143

Chandrapur Dist@News
•ना.सुधीर मुनगंटीवारांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात राबविणार भारतीय जनता युवा मोर्चा जनसेवा कार्यक्रम
महेश देवकतेंचा पुढाकार

चंद्रपूर :किरण घाटे

चंद्रपूर :ना. सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस येत्या 30 जुलै, 2024 ला आहे.
भारतीय जनता युवा मोर्चा, चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये जनसेवा कार्यक्रम राबवून साजरा करण्याचे ठरवले असल्याची माहिती भाजपचे युवा व तडफदार नेते महेश देवकते यांनी आज चंद्रपूर मुक्कामी या प्रतिनिधीस दिली.

सुधीर भाऊ हे लोकांची अनेक वेगवेगळ्या स्वरूपाने सेवा करत असतात. रुग्णांना मदत करत असतात, गरिबांना सहकार्याच्या करण्याच्या भूमिकेने काम करीत असतात. शेतकरी शेतमजूर यांना सुद्धा भाऊंच्या माध्यमातून मदत मिळत असते. अशा प्रत्येक क्षेत्रातील कोणत्या ना कोणत्या माध्यमातून भाऊ त्यांना मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात.

अशा लोकनेतेच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने वृक्ष लागवड असेल रुग्णांना फळ वाटप असेल शालेय विद्यार्थ्यांना बुक वाटप असेल व सुधीर भाऊंसाठी मंदिरामध्ये भक्ती अर्चना व अभिषेक कार्यक्रम अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत.
जिल्ह्यातील जिवती, कोरपना, कोरपना शहर, राजुरा, राजुरा शहर, गडचांदूर शहर, गोंडपिपरी, गोंडपिपरी शहर , बल्लाहरशा., बल्लारशाह शहर, मुल , मूल शहर, पोभूर्णा,चंद्रपूर भद्रावती , भद्रावती शहर,वरोरा , वरोरा शहर ब्रह्मपुरी, ब्रह्मपुरी शहर ,नागभीड ,चिमूर, सिंदेवाही अशा विविध ठिकाणी युवा मोर्चाचे पदाधिकारी ना.मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जनसेवा कार्यक्रम राबविणार आहेत.