Home Breaking News Mul taluka @news • माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनाच्या...

Mul taluka @news • माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनाच्या वतीने मूल नगरीत वृक्षारोपण कार्यक्रम

110

Mul taluka @news
• माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनाच्या वतीने मूल नगरीत वृक्षारोपण कार्यक्रम

सुवर्ण भारत:किरण घाटे

मूल : भारताचे पूर्व राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्मृतिप्रित्यर्थ तसेच शिक्षण सप्ताहाचे औचित्य साधत प्रविण भरतकर यांनी मूल नगरीत वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता.
बाल विकास प्राथमिक शाळेत पार पडलेल्या एका कार्यक्रमात डॉ. आनंदराव कुडे यांनी माहिती अधिकार बाबत मुलांना मार्गदर्शन केले. तर . बुटे यांनी वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून दिले.
या कार्यक्रमाला डॉ. आनंदराव कुडे प्रविण भरतकर ,संजय चिटमलवार प्रविण गोहने , रजनी झाडे ,तारका खोब्रागडे , बुटे ,सोनवणे ,बल्लावार नन्नावरे ,लांजेवार ,कापसे ,खोब्रागडे कवाडे, ओमदेव मोहुर्ले या शिवाय सामाजिक कार्यकर्ते, माता, पालक विद्यार्थी व विद्यार्थींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बल्लावार यांनी केले.