Home Breaking News आष्टी/ पाटोदा /शिरुर विधानसभा मतदारसंघात मनसे निवडणुक लढवणार —- कैलास दरेकर...

आष्टी/ पाटोदा /शिरुर विधानसभा मतदारसंघात मनसे निवडणुक लढवणार —- कैलास दरेकर यांना मनसेचा चेहरा म्हणून संधी !

93

Beed dist @news

आष्टी/ पाटोदा /शिरुर विधानसभा मतदारसंघात मनसे निवडणुक लढवणार —-

• कैलास दरेकर यांना मनसेचा चेहरा म्हणून संधी !

सुवर्ण भारत : गोरख मोरे
बीड जिल्हा प्रतिनिधी

मनसेचे नेते राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणुक स्वबळावर लढणार अशी घोषणा केली असून , मनसेने पक्षांतर्गत चाचपणी सुरू केली असून , तसा गोपनीय अहवाल घेतल्याचेही राज ठाकरे यांनी आपल्या मेळाव्यातील भाषणात जाहिर केले . आष्टी/पाटोदा/शिरुर विधानसभा मतदारसंघाचा विचार झाल्यास पक्षाकडे पक्षातील एकमेव आश्वासक चेहरा फक्त कैलास दरेकर असून , गेली सतरा वर्षे पक्षाच्या चढ उताराचा काळात ठामपणे पक्षाची बाजू आष्टी मतदारसंघात मांडली गेली , गेल्या काही वर्षात मनसेचे कैलास दरेकर यांनी अनेक आंदोलने केली असून , २०१६ शेतकरी कर्जमाफीसाठी आष्टी ते मुंबई सायकल मोर्चा असेल, शेतकऱ्यांचा उडीद हमी भावाने खरेदी करण्यासाठी आंदोलन , वैयक्तिक विहीर, शेत तलाव योजनेत शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन लाभ दिला जातो , तसेच घरकुल योजनेचा जास्तीचे बांधकाम फिस वसूली असेल , शौचालय घोटाळा असेल यावर अशा अनेक प्रश्नांवरून आपल्या पक्षाची बाजू भक्कमपणे मांडताना कैलास दरेकर आष्टी/ पाटोदा/ शिरूर विधानसभा मतदारसंघातील आम जनतेने पाहीलेले असून , मनसे ने २२५ ते २५० जागा लढल्यास आष्टी/ पाटोदा/ शिरूर विधानसभा मतदारसंघात मनसेचा चेहरा म्हणून कैलास दरेकर यांना संधी मिळू शकते ! यात तिळमात्र शंका नाही .