Home Breaking News •आजचे विद्यार्थी – उद्याचे भविष्य! •गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त...

•आजचे विद्यार्थी – उद्याचे भविष्य! •गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना

104

•आजचे विद्यार्थी – उद्याचे भविष्य!

•गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळ्यात मान्यवरांनी व्यक्त केल्या भावना

चंद्रपूर :किरण घाटे 

शहरातील स्थानिक आय. एम .ए हाॅल येथे डॉ. गंगारामजी अहिर चॅरिटेबल ट्रस्ट आणि कमल क्लबच्या वतीने गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री तथा मागास वर्गीय ओबोसी आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती.
सर्व मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थ्यांचा या वेळी गौरव करण्यात आला .
आजचे विद्यार्थी उद्याचे भविष्य आहे. हा सन्मान म्हणजे त्यांच्या कार्याची प्रशंसा पर्वणी आहे.आपण असेच पुढे जावे आणि चंद्रपूर जिल्ह्याचे नाव मोठे करावे! अशी भावना यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या बोलण्यातून व्यक्त केली.