Home Breaking News विदर्भ तेली समाज महा‌संघ चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीची सभा पार पडली :सभेत विविध...

विदर्भ तेली समाज महा‌संघ चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीची सभा पार पडली :सभेत विविध विषयांवर चर्चा सभेला अनेकांची उपस्थिती

199

विदर्भ तेली समाज महा‌संघ चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीची सभा पार पडली :सभेत विविध विषयांवर चर्चा
सभेला अनेकांची उपस्थिती

चंद्रपूर :किरण घाटे

आज रविवार दि.28 जुलै २०२४ ला विदर्भ तेली समाज महासंघाच्या चंद्रपूर जिल्हा कार्यकारिणीची सभा स्थानिक संताजी सभागृहात पार पडली.
चंद्रपूर जिल्हा व तालुका स्तरावरील महासंघाचे पदाधिकारी, सदस्य व निमंत्रित मान्यवर मंडळी मोठ्या संख्येंने उपस्थित होती.
सामाजिक, राजकिय व शैक्षणिक क्षेत्रातील अनेक समस्यांवर या वेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.

चंद्रपूर जिल्ह्यात तेली समाज सर्वात मोठ्या संख्येने असून समाजाचे राजकारणात प्रतिनिधीत्व दिसून येत नाही .यावर देखील सर्वाधिक लक्ष वेधून चर्चा करण्यात आली. समा‌जातील जिल्ह्यात शिक्षण घेण्याऱ्या युवकांच्या समस्या, मोठ्या प्रमाणात वाढणारी बेरोजगारी यांच्यावरही चर्चा झाली .राजकिय पक्षांनी येणाऱ्या निवडणूकीत तेली समाजाला प्रतिनिधत्व दे‌ण्याबाबतचा ठराव सर्वानुमते घेण्यात आला.

सभेच्या अध्क्षस्थानी विदर्भ तेली समाज महासंघाचे केंद्रीय मार्गदर्शक जेष्ठ अधिवक्ता ॲड .विजय मोगरे होते. त्यांनी समाजानी संघटित होऊन काम करावे‌ व सर्व राजकीय पक्षांनी समाजाची दखल घ्यावी असे या वेळी आवर्जून सांगितले.
विदर्भ तेली समाज महासंघचे केंद्रीय उपाध्यक्ष डॉ. विश्वास झाडे यांनी समाजातील सर्व घटकांनी एकत्रित यावे. आणि समाजाशी बांधीलकी ठेवून समाजाला सर्वोपरी मदत करावी असे आवाहन त्यांनी उपस्थितीतांना यावेळी केले.

नवनियुक्त जिल्हाध्यक्ष प्रा .डॉ. संजय बेले यांनी विदर्भ अध्यक्ष रघूनाथ शेंडे व संपूर्ण केंद्रीय पदधिका-यांचे नियुक्त्या केल्याबद्दल आभार मानले. समाजातील वर्तमान संघटन व समाजाची प्रत्येक क्षेत्रातील मागासलेपणा दूर करण्यासाठी प्रयत्न केले जाईल व समाजाला दिशा देण्याचे काम संघटनेच्या माध्यमातून करन्यात येईल असे या वेळी त्यांनी सांगितले.
सभेला नवनियुक्त कार्यध्यक्ष डॉ. नामदेव वरभे यांनी प्रास्ताविकेतून महासंघाची भुमिका स्पष्ट केली .
मंचावर शहराध्यक्ष अभय घटे, महिला आघाडी प्रमुख चंदा वैरागडे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मीनाक्षी गुजरकर उपस्थित होते
या शिवाय चिमूरचे ईश्वर डुकरे, वरोराचे टिपले, पिसे, भद्रावतीचे मोते, घूग्घूसचे सोनल भरडकर, राजूराचे पुरुषोतम गंधारे, बल्लारपुरचे खनके, घुबडे, कोठारीचे सतीश बावने, मुलचे चलाख, शैलेश जुमडे, विकास घटे, ऍड .प्रवीण पिसे, जितेंद्र इटनकर. छबु वैरागडे, ऍड. वामनराव खेडकर, सुवर्णा लोखंडे, ॲड. रमेश टिकले, मनीष खनके, ॲड. विजय हजारे, डॉ. प्रसाद पोटदुखे ,ऍड अनिरुद्ध टिकले, दिक्षांत बेले, भूषण देशमुख, आदिं उपस्थित होते.