Home Breaking News Chimur taluka@ News • चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन तर्फे चिमूर कोलारा मार्गावरील...

Chimur taluka@ News • चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन तर्फे चिमूर कोलारा मार्गावरील धोकादायक काटेरी वृक्षांची केली छाटणी • अनेकांची झाली होती यामुळे अपघात

234

Chimur taluka@ News
• चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन तर्फे चिमूर कोलारा मार्गावरील धोकादायक काटेरी वृक्षांची केली छाटणी
• अनेकांची झाली होती यामुळे अपघात

सुवर्ण भारत:शार्दुल पचारे
तालुका प्रतिनिधी चिमूर

चिमूर :दिनांक.३०/०७/२०२४ गोरगरिबांच्या मदतीस नेहमी एका हाकेवर २४ तास तत्पर राहणारा एकमेव चिमूर क्रांती बहुजन फाऊंडेशन आहे. कुठे घडलेला अपघात असो अथवा जनतेच्या रास्त मागण्या यांना वाचा फोडण्याचे काम , झोपी गेलेल्या शासनाला जागे करण्याचे काम , या फाऊंडेशन तर्फे केले जात असून चिमूर शहरातील स्थानिकांकडून चिमूर वरून जाणाऱ्या मासळ कोलारा मार्गावर काटेरी वृक्षाच्या फांद्या या रोडवर आल्याने यामुळे नेहमी दुचाकी चे अपघात होत आहे.अशी माहिती मिळाली असता चिमूर कोलारा मार्गावरील धोकादायक काटेरी वृक्षांची छाटणी करून पर्यटन मार्ग मोकळा करून देण्यात आला.यावेळी गौतम पाटील , विलास मोहिणकर , अमित मोदी , रोहन नन्नावरे , अक्षय नागरीकर , शार्दूल पचारे , श्याम दुधनकर व आदी उपस्थित होते.