Home Breaking News Chandrapur city@ News •ना. सुधीर मुंनगटीवारांचा वाढदिवस चंद्रपूरात थाटात व उत्साहात साजरा!...

Chandrapur city@ News •ना. सुधीर मुंनगटीवारांचा वाढदिवस चंद्रपूरात थाटात व उत्साहात साजरा! • वाढदिवसाच्या निमित्ताने माजी सभापती छबूताई वैरागडे व मित्र परिवारांनी केले होते विविध कार्यक्रमांचे आयोजन!

168

Chandrapur city@ News
•ना. सुधीर मुंनगटीवारांचा वाढदिवस चंद्रपूरात थाटात व उत्साहात साजरा!
• वाढदिवसाच्या निमित्ताने माजी सभापती छबूताई वैरागडे व मित्र परिवारांनी केले होते विविध कार्यक्रमांचे आयोजन!

चंद्रपूर – :किरण घाटे

चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस काल थाटात व उत्साहात पार पडला .
चंद्रपूर जिल्ह्यातच नव्हे तर अख्या महाराष्ट्रात लोकनेते व विकासपुरुष म्हणून ओळखले जाणारे उच्च शिक्षित ना. सुधीर मुंनगटीवार, यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

दरम्यान याच वाढदिवसाच्या निमिताने स्थानिक श्री सुधीरभाऊ मित्रपरिवारच्या वतीने सकाळी शालेय विद्यार्थ्यांना बॅग वाटप, वृक्षरोपण या शिवाय सुरक्षा जीवन योद्धा ठरलेले अर्जुन तुंबेकर , योगेश पेटले, प्रफुल चौधरी, श्याम कोटवाले,गौरव कुमरे, सुदिप डे, व प्रदीप लोडशिल्यवार यांचा मान्यवर मंडळींच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला .
सदरहु कार्यक्रम माजी नगरसेविका, छबूताई वैरागडे यांच्या जनसंपर्क कार्यालय जटपूरा वार्ड(पवनसूत दवा बाजार) या ठिकाणी थाटात पार पडला.
काल सकाळी योद्धांचा सन्मान, या शिवाय पोस्टऑफिस अपघात विमा, लाडकी बहीण योजना, आधार कार्ड, पोस्ट अकाउंट अश्या विविध प्रकारच्या शिबिरांचे आयोजन करण्यात आले होते.
आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चंद्रपूरच्या सुपरिचित समाजसेविका तथा माजी नगरसेविका छबूताई, वैरागडे, सुहास अलमस, कृष्णा चंदावर, चिराग नथवानी, सागर येळणे, भारती दुधानी, बल्लारपूर नगरीचे असलम शेख, चंदन पाल, साक्षी कार्लेकर, हर्ष पोपट, मनीषा कन्नमवार, सारिका भुते, छाया चवरे,ज्योती लक्कावार, मनीषा भाके, योगिता धनेवार, शालिनी राऊत, सोनू गुंडे, रोशनी गुंडे, सारिका यादव, करीना वांढरे, प्रिया खनके, संकेत पिपरे, यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले.