Home Breaking News Ballarpur taluka@ news • बल्लारपूरात आष्टेडू मर्दानी आखाडा जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न

Ballarpur taluka@ news • बल्लारपूरात आष्टेडू मर्दानी आखाडा जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न

309

Ballarpur taluka@ news
• बल्लारपूरात आष्टेडू मर्दानी आखाडा जिल्हास्तरीय स्पर्धा संपन्न

सुवर्ण भारत:शंकर महाकाली (संपादक)

बल्लारपूर :- तालुका क्रीडा संकुल, बल्लारपूर येथे आष्टेडू मर्दानी आखाडा क्रीडा स्पर्धा संपन्न झाली. सदर स्पर्धेच्या उद्घाटन चंदनसिंह चंदेल माजी अध्यक्ष वनविकास महामंडळ यांच्या हस्ते दीपप्रज्वन करून करण्यात आले.या प्रसंगी तालुका क्रीडा संयोजक किशोर मोहुर्ले, भाजपा शहर सचिव इंजि.देवेंद्र वाटकर, माजी शिक्षण सभापती सौ जयश्री मोहुर्ले, अनिल पांडे,पत्रकार श्रीनिवास कांदिकुरी प्रामुख्याने उपस्थित होते. हा खेळ शिवकालीन प्राचीन खेळ असून शालेय खेळामध्ये सुद्धा समाविष्ठ करण्यात आलेला आहे. या खेळाची प्रचार प्रसिद्धी व्हावी म्हणून सदर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेचे आयोजन आष्टेडू मर्दानी आखाडा असोसिएशन, बल्लारपूर च्या वतीने करण्यात आले. आयोजक अध्यक्ष गुलाम अहमद, मनोज डे, प्रशांत पिंपळे, स्वप्निल डंबारे, रोहित शर्मा, विवेक शर्मा, स्नेहल खैरे, निशांत आत्राम,परवेज खान,रितेश निरांजने, कोमल जंजरला, वैष्णवी, जानवी, रितेश निराजने, सोनम कुशवा, आदीनी स्पर्धा यशस्वी करण्याकरिता सहयोग दिला.
स्पर्धेचे संचालन सिंधू कुशवाह यांनी केले आभार प्रदर्शन गुलाम अहमद यांनी केले. सदा स्पर्धेत जवळपास ३०० विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.