Home Breaking News Chandrapur city@ News • २० फूट खड्यात पडली महिला रैयतवारी कॉलरी परिसरात...

Chandrapur city@ News • २० फूट खड्यात पडली महिला रैयतवारी कॉलरी परिसरात भूस्खलन

413

Chandrapur city@ News
• २० फूट खड्यात पडली महिला रैयतवारी कॉलरी परिसरात भूस्खलन

सुवर्ण भारत: शंकर महाकाली ( संपादक)

चंद्रपूर:शहरातील रयतवारी कॉलरी येथील आमटे ले- आऊटमध्ये असलेल्या एका घराच्या आतील जमीन अचानक २० फुटांवर खचून त्यात एक महिला व तिचा पाळीव कुत्रा पडल्याची घटना आज दुपारी १२.३० च्या सुमारास घडली. घरात महिला पडल्याच्या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली. आवारात लोकांची गर्दी जमली होती. काही वेळातच ही घटना वाऱ्यासारखी शहरात पसरली. पोलिसांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून जमाव हटवला आणि घराच्या आवारात जाण्यास मज्जाव केला.

माहितीनुसार, शहरातील रयतवारी कॉलरी परिसरातील आमटे लेआऊट मध्ये शेकडो लोकांची घरे आहेत. सुरेश माधव शिवणकर यांचे लेआऊट येथे दोन मजली घर आहे. आज घरातील महिला संगीता शिवणकर या घरी काम करत होत्या. दरम्यान, अचानक १२.३० वाजता घराच्या पहिल्या खोलीचा जमीन खचून गेली. त्यात संगीता शिवणकर पडल्या. सुमारे २० फूट खड्ड्यात पडलेल्या महिलेने मदतीसाठी हाक मारली. आवाज ऐकताच लुमेश ​​शिवणकर व शेजाऱ्यांनी जखमी महिलेला सीडीच्या साहाय्याने खड्ड्यातून बाहेर काढले. महिलेच्या हाताला आणि पायाला दुखापत झाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. महिलेला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. घरात मोठा खड्डा तयार होण्याबरोबरच हा खड्डा आजूबाजूच्या इतर खोल्यांपर्यंत वाढेल, असे घरातील लोकांकडून सांगण्यात आले. या घटनेनंतर लोकांनी घरातील टीव्ही, पलंग, कपाट आणि इतर सामान काढण्यास सुरुवात केली. घरातील सर्व सामान बाहेर काढून घर रिकामे केले. रामनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक आणि तहसीलदार घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पंचनामा सुरू केला होता. घरामध्ये दरड कोसळण्याच्या घटनेनंतर आजूबाजूचे लोक भयभीत झाले आहेत. या जमिनीखालून वेकोलिचे उत्खनन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासन ने त्या परिसरातील घरे खाली करण्याचे आदेश दिले आहे.